कोरोनाचा प्रवेश आता अखेरच्या खंडावरही

कोरोनाचा प्रवेश आता अखेरच्या खंडावरही

 • जगभरात थैमान घालणाऱ्या विषाणूने शेवटी अंटार्क्टिका खंडातही प्रवेश केला आहे.
 • चिली सैन्याचे अंटार्क्टिका द्वीपकल्पातील त्यांच्या वर्नाडो ओ हिगीन्स्‌ या संशोधन केंद्रात कोरोनाची 36 प्रकरणे उघडकीस.
 • चिली तळावरील 26 सैन्य अधिकाऱ्यांना व 10 कंत्राटदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने संशोधनात उघड.
 • आता कोविडची प्रकरणे सर्व सात खंडावर नोंदवली गेली आहेत.
 • चिलीचे संशोधन अंटार्क्टिक खंडाच्या उत्तर टोकाला आहे, चिलीच्या चार संशोधन केंद्रापैकी बर्नाडो ओ हिगीन्स्‌ हे सैन्याद्वारे चालविले जाते.
 • चिली हे लॅटिन अमेरिकेतील सहावा सर्वात मोठा देश आहे. येथे 5,85,000 हून अधिक कोरोनाची दृष्टी झाली आहे.
 • कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दैनंदिन कामकाज अधिक आखीव केले आहे व पर्यटनावर बंदी घातली आहे.

अंटार्क्टिका खंडाबाबत 

 • पृथ्वीवरील सात खंडापैकी एक व हा खंड सर्वात दक्षिणेस आहे.
 • ट्रान्सअंटार्क्टिका पर्वतरांगांनी विभागला आहे.
 • पॅसिफिक, अटलांटिक व हिंदी महासागराने (आता दक्षिणी महासागर) अंटार्क्टिका खंड वेढला आहे.
 • अंटार्क्टिका खंडावर 31 संशोधन केंद्र आहेत व एक हजार लोकांचे वास्तव्य आहे.

Contact Us

  Enquire Now