कोरोनाचा नवीन व्हेरियंट – ओमायक्रॉन
- दक्षिण आफ्रिकेतील दोन जीनोम सिक्वेन्सिंग संस्थांचे प्रमुख टुलिओ डि आलिवेरा यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची घोषणा केल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेने याला चिंताजनक व्हेरियंटच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे.
ओमायक्रॉनविषयी
- ओमायक्रॉनमध्ये ३० पेक्षाही अधिक स्पाइक प्रोटीन म्यूटेशन्स (बदल) आढळले असून हा अत्यंत संसर्गजन्य आहे.
- या प्रकाराला B.1.1529 असे नाव देण्यात आले होते; WHO ने त्यास ओमायक्रॉन (Omicron) हे नाव दिले आहे.
- ओमायक्रॉन हे ग्रीक वर्णमालेतील पंधरावे अक्षर आहे.
- WHO ने या आधी येणाऱ्या Nu आणि Xi यांचे नाव या प्रकाराला दिले नाही, कारण Nu नवीन उच्चारांमुळे, तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांच्या नावाशी साम्य असल्यामुळे Xi ही अक्षरे वगळण्यात आली आहेत.
- पहिल्यांदा आढळ: या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण २४ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत आढळून आला.
- कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा ६ पटीने अधिक संसर्गजन्य असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
WHO च्या चिंताजनक व्हेरियंट यादीत समावेश केलेले कोरोना व्हेरियंट
१) | ओमायक्रॉन | B.1.1.529 | नोव्हेंबर २०२१ | दक्षिण आफ्रिका |
२) | डेल्टा | B.1.617.2 | २०२० | भारत |
३) | गॅमा | P.1 | २०२० | ब्राझिल |
४) | बिटा | B.1.351 | २०२० | दक्षिण आफ्रिका |
५) | अल्फा | B.1.1.7 | २०२० | ब्रिटन |
WHO च्या व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट या यादीतील कोरोना व्हेरियंट
१) | म्यू | B.1.621 | २०२१ | कोलंबिया |
२) | लम्बडा | V.37 | २०२० | पेरू |
व्हेरियंटचा शोध कसा लावतात?
- जीनोम सिक्वेन्सिंग ही एखाद्या विषाणूचा वेगळा व्हेरियंट शोधण्यासाठी सर्वात महत्त्वाची पद्धत
- जगातील प्रत्येक सजीवाची जडणघडण कशी असेल ही त्याच्या जीन्सवर ठरत असते आणि त्या सजीवाचा पूर्ण जेनेटिक कोड म्हणजे जीनोम.
- उदा. आपले आणि आपल्या आईवडिलांचे थोडे फार जीन्स सारखे असले तरी त्यांचे व आपले जीनोम सिक्वेन्स अगदी भिन्न असतात.
- या जीनोमचे रूपांतर एका कोडमध्ये केले जाते यालाच जीनोम मॅपिंग किंवा जीनोम सीक्वेन्सिंग म्हणतात.
- याचप्रमाणे कोरोना व त्याच्या विविध व्हेरियंट्सचे जीनोम कोड ठरविण्यात आले आहे, त्यामुळे एखाद्या रुग्णामध्ये कोरोना विषाणूचा व्हेरियंट आढळल्यानंतर त्यांची या डेटाबेसमध्ये आधीच उपलब्ध असलेल्या जीनोम कोडशी तुलना केली जाते.
- रुग्णाच्या शरीरातील व्हेरियंट मॅच न झाल्यास तो नवीन व्हेरियंट आहे हे लक्षात येते.
भारत आणि जीनोम सिक्वेन्सिंग
- २५ डिसेंबर २०२० रोजी कोरोना विषाणूच्या व्हेरियंट्स्बाबत माहिती गोळा करण्यासाठी इंडियन सार्स सीओव्ही-२ कन्सॉर्शियम ऑन जीनॉमिक्स (INSACOG) हा फोरम तयार करण्यात आला होता.
- या अंतर्गत देशांतील दहा प्रयोगशाळांत जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले.
सावधानतेसाठी उपाययोजना
- जोखीम आधारित आणि वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी.
- सार्वजनिक आरोग्य जोपासणे (उदा. मुखपट्टी, गर्दीची जागा टाळणे, सोशल डिस्टन्सिंग)
- जीव वाचवण्यासाठी आणि आर्थिक वाढीसाठी जैववैद्यकीय संशोधन आणि क्षमता निर्मितीवर भर देणे, भारतासाठी आवश्यक.