कोपा अमेरिका चषक २०२१

कोपा अमेरिका चषक २०२१

 

यजमान देश : ब्राझील

कालावधी : १३ जून ते ११ जुलै २०२१

ठिकाण : मराकाना स्टेडियम

संघ : १०

विजेता संघ : अर्जेंटिना

उपविजेता संघ : ब्राझील

गोल्डन बूट : लिओनेल मेसी

सर्वोत्कृष्ट खेळाडू : लिओनेल मेसी आणि नेमार

सर्वोत्तम गोलरक्षक : इमिलिआनो मार्टिनेस (अर्जेंटिना)

सामना वीर : एंजेल डी मारिया (अर्जेंटिना)

खेलभावनेचा पुरस्कार : ब्राझील

महत्त्वाचे :

 • १९९३ नंतर तब्बल २८ वर्षांनी कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद अर्जेंटिनाने मिळविले.
 • हे जेतेपद पटकावण्याची अर्जेंटिनाची १५ वी संधी.
 • ब्राझीलविरुद्धच्या या सामन्यात १-० अशी बाजी मारत अर्जेंटिना विजयी झाला.
 • यासह अर्जेंटिना सर्वाधिक वेळा कोपा अमेरिका जिंकणाऱ्यांच्या यादीत उरुग्वेसह संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले आहे, तर ब्राझीलकडे १२ वेळा उपविजेतेपद.

लिओनेल मेसी:

 • जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळख असणाऱ्या मेसीचे कारकीर्दीतील पहिलेच आंतरराष्ट्रीय जेतेपद.
 • यापूर्वी २०१४ विश्वचषक, २००७, २०१५, २०१६ च्या कोपा अमेरिका स्पर्धा असे चार वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.
 • मेसीने या स्पर्धेदरम्यान अर्जेंटिनाच्या नेतृत्वाखाली १५१ आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा विक्रमही केला.
 • यंदाच्या स्पर्धेत मेसीने चार गोल केले आणि पाच गोल करण्यात मोलाचे योगदान दिले, मात्र अंतिम सामन्यात संधी मिळूनही ब्राझीलचा गोलरक्षक एडरसनमुळे त्याला गोल करता आला नाही.
 • पुढच्या वर्षी कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक सामन्याकडे त्याचे आता लक्ष आहे.
 • मेसीने २००५ साली २० वर्षांखालील विश्वचषक आणि २००८ साली बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले होते.

मेसीची कोपा अमेरिका स्पर्धेतील कामगिरी 

वर्ष सामने विजय पराभव गोल संघ-कामगिरी
२००७ उपविजेते
२०११ उपांत्यपूर्व फेरी
२०१५ उपविजेते
२०१६ उपविजेते
२०१९ उपांत्य फेरी
२०२१ विजेते
एकूण ३४ २१ १३

Contact Us

  Enquire Now