केशवसुतांचे मालगुंड ‘पुस्तकांचे गाव’ बनणार

केशवसुतांचे मालगुंड ‘पुस्तकांचे गाव’ बनणार

  • प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचे एक गाव निर्माण करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यानुसार केशवसुतांचे मालगुंड ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून विकसित होण्याला चालना मिळणार आहे.
  • कोमसापच्या रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनात तत्कालीन मंत्री विनोद तावडे यांच्या सुचनेनुसार कवी केशवसुतांचे मालगुंड पुस्तकांचे गाव म्हणून निवडण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
  • त्यादृष्टीने डिसेंबर २०१५ ला राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून तत्काळ पावलेही उचलली. मालगुंडबरोबरच महाबळेश्वरमधील भिलारी गावाचा समावेश होता.
  • मराठी भाषा विभागाच्या पथकाने मालगुंडला भेट देऊन प्रेक्षणीय स्थळे, लिमये वाडा, शुभ्रकमल तलाव, ग्रामपंचायत मालगुंड अशा विविध जागांची पाहणी केली.
  • पर्यटकांना वाचण्याची किंवा पुस्तके विकत घेण्याची सुविधा देता येऊ शकेल, असा सकारात्मक विचारही सरकारने व्यक्त केला.

Contact Us

    Enquire Now