केळीच्या निर्यातीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर
- देशातील केळीच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. डिसेंबर २०२० पर्यंत झालेल्या केळीच्या ४७० कोटी रुपयाच्या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ३४२ कोटी रुपयांचा आहे.
- महाराष्ट्रात जळगाव जिल्हा केळी उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे.
- सन २०१९-२० मध्ये देशातून ६५८ कोटी रुपयांची १ लाख ९५ हजार ७४६ टन केळींची निर्यात झाली. त्यातील महाराष्ट्राचा वाटा ४२८ कोटी रुपयांचा म्हणजेच १ लाख ८ हजार ९६० टनांचा होता.
- राज्यातील केळीचे क्षेत्र ८० हजार हेक्टर असून सर्वात जास्त क्षेत्र म्हणजेच ४८ हजार हेक्टर क्षेत्र जळगाव जिल्ह्यात आहे.
- जी-९ (ग्रेड नाईन) या वाणाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.