केनियातर्फे राज्याला 12 टन चहा कॉफी
- वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेला अल्पस्वरूप मदत म्हणून केनियाच्या मसाई नागरिकांनी चौदा गायी दिल्या होत्या. त्याचप्रमाणे कोविड विरोधातील युद्धात मदत म्हणून महाराष्ट्राला 12 टन कॉफी आणि चहा दिला आहे.
- एकीकडे भारताने मानवतेच्या दृष्टीकोनातून अनेक देशांना कोरोनाच्या लसी दिल्यानंतर भारतात आंदोलने होत आहेत. मात्र सतत दुष्काळाचा सामना करत असलेल्या वाळवंटी प्रदेशातील केनिया सरकारने स्वतःच्या देशातील दुर्भिष्ट्य बाजूला ठेवून ही मदत दिली.
- महाराष्ट्रासाठीचे हे ग्राह्य ‘रेडक्रॉस’च्या ताब्यात देण्यात आले आहे. हा साठा देण्यासाठी केनियाचे भारतातील उच्चायुक्त विली बेट हे स्वतः नवी दिल्लीतून मुंबईत आले होते.
- त्यावेळी त्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील मुंबई महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
- केनियाचे मुंबईतील आनंद वाणिज्यदूत समावतार गोएंका यांनी केनियाकडून मिळणारी मदत स्वीकारताना आनंद व्यक्त केला.