केंब्रिज ॲनेली टीकाविरुद्ध ‘सीबीआय’ कडून गुन्हा-
- केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ब्रिटनमधील केंब्रिज ॲनेलिटिका व ग्लोबल सायन्स रिसर्च लिमिटेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- फेसबुककडून भारतातील वापरकर्त्यांची माहिती व्यावसायिक कारणासाठी मिळवल्याने गोपनीयतेच्या कलमाचा भंग झाला – याकारणास्तव हा गुन्हा दाखल केला आहे.
- ग्लोबल सायन्स रिसर्च संस्थेने ‘धिस इज युवर डिजिटल लाइफ’ नावाचे उपयोजन तयार केले होते. त्यासाठी फेसबुकने त्याच्या वापरकर्त्यांची माहिती घेण्यास मंजुरी दिली होती.
- कंपनीने केंब्रिज ॲनेलिटिकाशी गुन्हेगारी स्वरूपाचा कट करून माहिती व्यावसायिक वापरासाठी दिली असा आरोप आहे.
- मिळवलेली माहिती २०१६-१७मध्ये नष्ट केली जाईल अशी लिखित ग्वाही या संस्थेने फेसबुकला दिली होती पण चौकशीअंती ती नष्ट केली गेली नाही हे कळाले.
- एकूण ५.६२ लाख भारतीय फेसबुक वापरकर्त्यांची माहिती यात वापरण्यात आली असून तिचा वापर निवडणुकांत मतदारांवर प्रभाव टाकणारे, व्यवसायिक नफा मिळवणे यासाठी करण्यात आला आहे.
- इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत २५ जुलै २०१८ रोजी सीबीआयकडे तक्रार केली होती.
केंद्रीय अन्वेषण विभाग- Central Bureau of Investigation
- स्थापना – १ एप्रिल १९६३ (संथानम समिती शिफारस)
- मुख्यालय – नवी दिल्ली
- ध्येय : उद्यमशीलता, निष्पक्षपातीपणा व प्रामाणिकपणा
- ही भारत सरकारची विशेष पोलीस अस्थापना, गुन्हे अन्वेषण विभाग व गुप्तहेर खाते आहे.
- ही वैधानिक संस्था नाही, हिला ‘दिल्ली विशेष पोलिस आस्थापना कायदा १९४६’अन्वये अधिकार प्राप्त झाले आहेत.
- सीबीआय कार्मिक मंत्रालयाच्या ‘कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या’ प्रशासकीय नियंत्रणाखाली येते.
- सीबीआय संचालक : ऋषी कुमार शुक्ला