केंद्र सरकारची सहकार मित्र योजना
- नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (एनएसडीसी) ‘सहकार मित्र’ या इंटर्नशिप योजनेचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी उद्घाटन केले. सहकार क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव आणि स्टार्ट-अपसाठी सुलभ आणि जलद कर्ज उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे.
- विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी आणि तरुण एनएसडीसी सोबत काम करत सहकार क्षेत्रात उद्योजकता विकास, शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये उद्योजकता विकासासाठी योजना राबवल्या जाणार आहेत.
- कृषी क्षेत्रातील स्नातक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील स्नातक या योजनेत सहभागी होऊ शकतील. एनसीडीसीने या योजनेसाठी विशेष फंड स्थापन केला आहे.