केंद्र सरकारकडून सिरमला एक कोटी, दहा लाख कोविशील्ड लसींची ऑर्डर

केंद्र सरकारकडून सिरमला एक कोटी, दहा लाख कोविशील्ड लसींची ऑर्डर

 • कोरोना प्रतिबंधक लस खरेदीची पहिली ऑर्डर ‘सिरम इन्स्टिट्यूट’ ऑफ इंडियाकडे केंद्र सरकारने नोंदविली.
 • एक कोटी दहा लाख लसीच्या डोसची ही ऑर्डर असून एका डोसची किंमत २०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
 • केंद्र सरकारच्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (एसडीएससीओ), जानेवारीला ‘कोविशील्ड’ आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.
 • पुण्यातून सिरमच्या कोव्हिशील्डचे देशातील १३ शहरांत वितरण करण्यात आले आहे.
 • पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या दिशांप्रमाणे या शहरांची वर्गवारी करून ह्या लसीचे वितरण करण्यात येणार आहे.
 • मुख्य केंद्रापर्यंत लस वितरणासाठी १० ते १२ कोल्ड स्टोअरेज ट्रक सज्ज आहेत.
 • कुल-एक्स-कोल्ड चेन लिमिटेड ही कंपनी लसींची देशभरात वाहतूक करणार आहे.
 • पुण्यातून ५६.५ लाख लसीचे खुराक पुढील शहरांत एअर इंडिया, स्पाईसजेट, इंडिगो या एअरलाईन्सच्या माध्यमातून रवाना करण्यात आले आहेत.

१) दिल्ली

२) चेन्नई

३) कोलकाता

४) गुवाहाटी

५) शिलाँग

६) अहमदाबाद

७) हैदराबाद

८) विजयवाडा

९) भुवनेश्वर

१०) पटना

११) बंगळूरू

१२) लखनऊ

१३) चंदिगड

 

लसीचे नियोजन

 

 • पहिला टप्पा – देशातील खासगी व शासकीय रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल.
 • दुसरा टप्पा – ५० वर्षांपुढील नागरिक व ५० वर्षांखालील अन्य आजार असलेल्या नागरिकांना लस देण्यात येईल.
 • पुढील सहा ते आठ महिन्यांत देशातील ३० कोटी जनतेला ही लस देण्यात येणार आहे.
 • पहिल्या टप्प्यात कोविशील्ड लसीला प्राधान्य
 • कोविशील्ड :
 • ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्ट्राझेनेका यांनी विकसित केली हे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीने या लसीचे उत्पादन घेतले आहे.

 

कोव्हॅक्सिन :

 

 • भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR – Indian Council of Medical Research) च्या मदतीने भारत बायोटेक यांनी विकसित केली आहे.

 

कोविन ॲप –

 

 • देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू होणार आहे.
 • लस लाइव्ह ट्रॅकिंगसाठी को-विन ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.
 • कोरोना लस घेण्यापूर्वी कोविनमार्फत नोंदणी करणे बंधनकारक असेल.
 • कोविन ॲप लाँचबाबत सरकारकडून माहिती दिली जाईल व त्यानंतर लसीकरणासाठी नोंदणी करता येईल.

Contact Us

  Enquire Now