केंद्रीय शिक्षण मंत्र्यांद्वारे निपुण भारत कार्यक्रमाचे उद्घाटन

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांद्वारे निपुण भारत कार्यक्रमाचे उद्घाटन

 • केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी ५ जुलैला ऑनलाईन माध्यमातून निपुण (National Initiative for Proficiency in Reading with Understanding and Numeracy) भारत या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
 • केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाद्वारे हा कार्यक्रम राबवला जाईल.
 • हा कार्यक्रम सर्व राज्यांमध्ये २०२० च्या नवीन शिक्षण धोरणाला अनुसरून समग्र शिक्षा अभियानांतर्गत राबवले जाणार आहे.
 • पाच स्तरावर याची अंमलबजावणी होईल (देश-राज्य-जिल्हा-गट-शाळा)
 • उद्देश : नवीन शिक्षण धोरणाला अनुसरून २०२६-२७ पर्यंत ग्रेड-३ पर्यंत शिकणाऱ्या (म्हणजे वयोगट ३-९ वर्षे) सर्व विद्यार्थ्यांना आधारभूत साक्षरता आणि संख्यात्मक ज्ञान (Foundational Literacy & Numeracy) म्हणजेच वाचणे, लिहिणे आणि अंकगणित यांची क्षमता प्राप्त करून देणे .
 • शालेय शिक्षणाच्या मूलभूत वर्षांमध्ये मुलांना शिक्षणापर्यंत पोच देण्यावर  आणि त्यांना शाळेत टिकवून ठेवण्यावर हे अभियान लक्ष केंद्रित करेल.
 • शिवाय शिक्षक क्षमता बांधणी; उच्च  क्षमता असणारे आणि वैविध्यपूर्ण विद्यार्थी आणि शिक्षक संसाधने/शिक्षण सामग्रीचा विकास इत्यादी बाबींवर हे अभियान लक्ष केंद्रित करेल.

समग्र शिक्षा अभियान :

 • सुरुवात :  २४ मे २०१८ मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे
 • शालेय पूर्व ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे एकात्मिक पद्धतीने (Holistic) शिक्षण करण्यासाठी
 • सर्व शिक्षा अभियान (२००१), राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान (२००९) आणि शिक्षक शिक्षण योजना या तीन योजनांना एकत्रित करून समग्र शिक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली.
 • शिक्षणापर्यंत सर्वांची पोहोच, दर्जेदार आणि न्याय शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण तसेच शिक्षण संस्थांचे सक्षमीकरण आणि शिक्षणाचे व्यवसायीकरण ही उद्दिष्टे समग्र शिक्षा अभियानाद्वारे अभिप्रेत आहेत.
 • तसेच शाश्वत विकास ध्येय (SDG) क्र. ४ प्राप्त करणे हेसुद्धा या अभियानाचे ध्येय आहे.
 • एकात्मिक शिक्षक प्रशिक्षणातून शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारित करण्यासाठी निष्ठा (National Initiative for School Heads and Teachers Holistic Advancement-NISHTHA) हे अभियान ऑगस्ट २०१९ मध्ये सुरू करण्यात आले.
 • नवीन शिक्षण धोरणांतर्गत २०२० मध्ये पूर्वीच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय असे करण्यात आले.
 • शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभाग आणि शालेय शिक्षण व साक्षरता असे एकूण दोन विभाग आहेत.

Contact Us

  Enquire Now