केंद्रीय मंत्री ‘रामविलास पासवान’ यांचे निधन
- 8 ऑक्टोबर 2020 रोजी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांचे हृदयविकाराने नवी दिल्लीत वयाच्या 74 वर्षी निधन झाले.
- मतदार संघ = हाजीपूर (बिहार)
- जन्म = 5 जुलै 1946 (खगेरिया-पूर्व बिहार)
- पक्ष = लोकजनशक्ती पक्ष (LIP)
(बिहारचे दलित नेते म्हणून ओळख.)
-1969 ला सर्वप्रथम ते बिहारच्या विधानसभेवर सदस्य म्हणून संयुक्त समाजवादी पक्षाकडून निवडून आले.
- 1977 ला ते पहिल्यांदाच लोकसभेवर जनता पक्षाचे सदस्य म्हणून निवडून आले. हाजीपूर मतदारसंघातून सर्वाधिक फरकाने जिंकून त्यांनी गिनिज रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदवले.
- 2000 साली त्यांनी लोकजनशक्ती पार्टीची (LJP) स्थापना केली.
- 1977-2014 काळात लोकसभेवर 8 वेळा व 2010-2014 पर्यंत राज्यसभेचे सदस्य म्हणून काम पाहिले.
- वाजपेयी व मनमोहनसिंग सरकारमध्येही त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केले.
-उत्तर भारतातील दलितांना एकत्रित करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली.
-1990च्या मंडल आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
-त्यांनी परप्रांत कामगारांना स्वस्त किंमतीत धान्य मिळण्यासाठी ‘एक राष्ट्र एक रेशन कार्ड’ योजना सुरू केली.
=एक राष्ट्र एक रेशन कार्ड –
-प्रायोगिक सुरुवात – आंध्रप्रदेश-तेलंगणा, महाराष्ट्र-गुजरात या राज्यांमध्ये
- देशातील कोणत्याही रेशन कार्ड धारकाला देशात कोणत्याही रेशन दुकानातून धान्य घेण्यासाठी ही योजना सुरू केली.
- ज्याप्रमाणे मोबाईल नंबर देशात कोठेही गेल्यावर बदलावा लागत नाही त्याचप्रमाणे रेशन नंबर कार्य करेल.
- 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण देशभर ही योजना लागू होईल.