केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते ASIIM ची सुरुवात
- केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी 30 सप्टेंबर 2020 रोजी ‘आंबेडकर सोशल इनोव्हेशन ॲण्ड इन्क्युबेशन मिशन (ASIIM)’ची सुरुवात केली.
- यावेळी सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रतनलाल कटारिया, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाचे उपव्यवस्थापकीय संचालक सुनिल कुमार बन्सल उपस्थित होते.
- उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांमध्ये नाविन्य आणि उपक्रम वाढविण्यासाठी अनुसूचित जातींसाठीच्या व्हेंचर कॅपिटल फंड (VCF)-SC अंतर्गत हे अभियान सुरू करण्यात आले.
- या फंडाचा उद्देश SC उद्योजकांनी पदोन्नती केलेल्या 117 कंपन्यांना व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे.
योजनेची वैशिष्ट्ये :
- दिव्यांगांवर (अपंग व्यक्ती) लक्ष केंद्रित करून अनुसूचित जातींमधील युवक-युवतींमध्ये उद्योजकता वाढविणे.
- टेक्नॉलॉजी बिझिनेस इन्क्युबेटरच्या (TBI) च्या माध्यमातून 1000 अभिनव कल्पनांना (2024 पर्यंत) समर्थन पुरविणे.
- उद्योजकता वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण विचारांसह विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे.
ठळक मुद्दे :
- हा उपक्रम भारत सरकारच्या ‘स्टॅण्ड अप इंडिया प्रोग्रॅम’च्या अनुषंगाने आहे. या उपक्रमाला अर्थसहाय्य आणि त्याची अंमलबजावणी व्हेंचर कॅपिटल फंड (VCF)-SC द्वारे केली जाईल.
- ह्या उपक्रमांतर्गत उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये TBI मार्फत पुढील चार वर्षांत 1000 एससी युवकांची ओळख पटवली जाईल.
निधी :
- तरुणांना त्यांची स्टार्ट अप कल्पना व्यावसायिक कार्यात राबविण्यासाठी 3 वर्षांत 30 लाख रुपयांचा निधी दिला जाईल.
- यशस्वी उपक्रम (VCF)-SC कडून 5 कोटी रुपये व्हेंचर फंडिंगसाठी पात्र ठरतील.
अनुसूचित जातींसाठी व्हेंचर कॅपिटल फंड (VCF-SC) :
- हा फंड सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने 2014-15 मध्ये सुरू केला होता.
- SC/दिव्यांग युवांमध्ये उद्योजकतेचा विकास करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
अलिकडील बातम्या :
- 15 ऑगस्ट 2020 रोजी राज्य सरकार आणि 272 जिल्हाधिकाऱ्यांनी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत ‘ड्रग्ज फ्री इंडिया’ या नावाने सात महिन्यांपासून अमलीपदार्थविरोधी मोहीम राबविली. ती 31 मार्च 2021 पर्यंत चालेल.
- 7 सप्टेंबर 2020 रोजी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी 24 × 7 टोल फ्री मानसिक आरोग्य पुनर्वसन हेल्पलाईन ‘किरण’ (1800-500-0019) सुरू केली.
सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय :
केंद्रीय मंत्री – थावरचंद गेहलोत
राज्यमंत्री – कृष्णपाल गुर्जर, रतनलाल कटारिया, रामदास आठवले.