केंद्रीय दक्षता आयोगाकडून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना नोकरीसाठी निकष जारी

केंद्रीय दक्षता आयोगाकडून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना नोकरीसाठी निकष जारी

 • केंद्रीय दक्षता आयोगाने (CVC) कंत्राटी किंवा सल्लागारी तत्त्वावर आधारित सेवानिवृत्त अधिकाऱ्यास नोकरी देण्यापूर्वी दक्षाता मंजुरी मिळविण्यासाठी सरकारी संस्थांनी पाळावयाचे निकष परिभाषित केले आहेत.

या प्रक्रियेनुसार

 1. अखिल भारतीय सेवा आणि गट अ च्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना किंवा केंद्राच्या मालकीच्या अथवा नियंत्रणाखालील अन्य संस्थांमधील समकक्ष अधिकाऱ्यांना ज्या संस्थेतून ते निवृत्त झाले आहेत तेथून दक्षता मंजुरी (Vigilance Clearance) मिळवणे आवश्यक असेल.
 2. एखाद्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने एकापेक्षा जास्त संस्थांमध्ये काम केले असल्यास, सेवानिवृत्तीच्या १० वर्षांपूर्वी ज्या पदावर असेल त्याकडून मंजुरी घेणे आवश्यक
 3. मंजुरी मिळविण्यासाठी संप्रेषण (Communication) देखील केंद्रीय दक्षता आयोगास पाठवावे.
 4. स्पीड पोस्टद्वारे संप्रेषण पाठविण्याच्या १५ दिवसाच्या आत पूर्वीच्या नियोक्तांकडून काही उत्तर न आल्यास एक स्मरणपत्र पाठवले जाऊ शकते.
 5. मात्र २१ दिवसांच्या आत प्रतिसाद न आल्यास दक्षता मंजुरी देण्यात आली आहे, असे मानले जाईल.
 6. जर कर्मचारी कोणत्याही दक्षता – संबंधित प्रकरणात गुंतलेला आढळल्यास आधीची नियोक्ता संस्था सर्व परिणामी कार्यासाठी जबाबदार असेल.

नियमांची आवश्यकता का?

 1. एकसमान प्रक्रियेअभावी कधी कधी भूतकाळातील कलंकित अधिकाऱ्यांमुळे किंवा त्यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या खटल्यांमध्ये अधिकारी गुंतले होते.
 2. अशी परिस्थिती केवळ अनावश्यक तक्रारी अथवा पक्षपातीपणाच्या आरोपांनाच कारणीभूत ठरत नसून सरकारी संस्थांच्या निष्पक्षता व संभाव्यतेच्या तत्त्वांविरुद्धही आहे.

केंद्रीय दक्षता आयोग

 • स्थापना – १९६४ (संथानम समिती)
 • वैधानिक दर्जा – २००३
 • केंद्रीय दक्षता आयुक्त (अध्यक्ष) – श्री. संजय कोठारी

Contact Us

  Enquire Now