केंद्राकडून आणखी ४४ कोटी डोसची ऑर्डर

केंद्राकडून आणखी ४४ कोटी डोसची ऑर्डर

  • केंद्र सरकारने आणखी ४४ कोटी डोसची तातडीची ऑर्डर नोंदविली असून त्यात २५ कोटी कोव्हिशील्ड व १९ कोटी कोव्हॅक्सिन लसींचा समावेश आहे.
  • २१ जूनपासून १८ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण मोहीम सुरू होईल. केंद्रातर्फे राज्यांना मोफत लसपुरवठा होईल.
  • खासगी रुग्णालयांना ज्या २५ टक्के लसी दिल्या जातील त्यांची किंमत लस उत्पादकांतर्फेच निश्चित करण्यात येईल. खासगी क्षेत्राद्वारे होणारी लसीची मागणी, तिचे वितरण व विनियोग यांची देखरेख करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर असेल.
  • सध्या देशातील २०९ जिल्ह्यांमध्ये रोज १०० पेक्षा जास्त रुग्णसंख्या आहे. ४ मे रोजी देशातील ५३१ जिल्ह्यांत दररोज १०० हून जास्त रुग्ण होते. ही संख्या २०९ पर्यंत घटली. कोरोना रिकव्हरी दरही ९४.३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
  • केंद्राने राज्यांना निर्देश दिले आहेत की लसीसाठी आरोग्यसेवकांना प्राधान्य मिळावे, त्यानंतर ४५ वर्षांपुढील व नंतर १८ ते ४४ वयोगटाच्या लोकांना प्राधान्य द्यावे.
  • राज्य सरकारांनी आपापल्या प्राधान्यक्रमानुसार अपेक्षित लसमात्रांचा आकडा केंद्राला कळवायचा आहे. त्यानंतर राज्यांना किती तारखेला किती डोस मिळतील, याची माहिती केंद्र कळविणार.

Contact Us

    Enquire Now