केंद्रसरकारच्या कृषी कायद्यांना तात्पुरती स्थगिती
- देशभरात शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांना न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.
- या वादावर तोडगा काढण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.
- समितीत कृषी शास्रज्ञ अशोक गुलाटी, आंतरराष्ट्रीय खाद्यान्न धोरण संशोधन संस्थेसाठी काम करणारे प्रमोद जोशी, बी. एस. मान, व अनिल धनवंत यांचा समावेश करण्यात आहे.
समिती स्थापन करण्यामागचा उद्देश :
- निर्माण झालेली कोंडी सोडवण्यासाठी शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये चर्चा करण्यासाठी ही समिती बनविण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाची भूमिका
- कृषी कायदे चर्चा न करताच मंजूर केल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. सरकारशी गेल्या महिनाभर चर्चा सुरू असूनही काहीही तोडगा निघत नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
- आंदोलनात महिला लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक का? असा सवाल न्यायालयाने आंदोलनकर्त्यांना केला.
- हिंसाचाराची परिस्थिती उद्भवल्यास प्रत्येक व्यक्ती जबाबदार
कोणत्या कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे?
अ) शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक, २०२०
ब) शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक, २०२०
क) अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, २०२०
नविन कृषी कायद्यांनुसार सरकार व शेतकरी किंवा आंदोलकांचे काय म्हणणे आहे?
सरकार | शेतकरी |
१) कृषी उत्पन्न बाजार समितीने (APMC) मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी – विक्री करता येईल. | बाजार समित्या हद्दपार झाल्यास मध्यस्थ, आडत तसेच किमान आधारभूत किंमतीची (MSP) यंत्रणा मोडकळीस येईल. |
२) कंत्राटी शेतीमुळे शेतकऱ्यांना पिकासाठी घाऊक विक्रेते, प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा कंपनीसोबत करार करता येईल. परिणामी, मध्यस्थांना दूर करून शेतकरी पूर्ण नफा मिळवू शकतात. | कंत्राटी व्यवस्थेत शेतकरी वाटाघाटी करू शकतील का? लहान शेतकऱ्यांशी करार करण्यात कंपन्या तयार असतील का? |
केंद्र सरकारने आता डाळी, कडधान्ये, तेलबिया, कांदा, बटाटे यांना अत्यावश्यक यादीतून वगळल्यामुळे साठा करण्यावर निर्बंध राहणार नाहीत, खासगी गुंतवणूक वाढेल आणि किंमती स्थिर राहण्यास मदत होईल. | मोठ्या कंपन्या वाटेल तेवढा साठा करू शकतील तसेच शेतकऱ्यांना कंपन्यांच्या सांगण्याप्रमाणे उत्पादन घ्यावे लागेल. |