कॅट्सा
- नवी दिल्लीला दिलेल्या भेटीदरम्यान अमेरिकेच्या उपपरराष्ट्रमंत्री वेंडी शर्मन यांनी असे सूचित केले आहे की भारताने रशियन-निर्मित एस -४०० ट्रायम्फ एन्टी-एअरक्राफ्ट क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेतल्यास अमेरिका भारत सरकारवर निर्बंध लादण्याचा पुनर्विचार करू शकते.
- भारताचा सर्वात मोठा संरक्षण भागीदार असलेल्या रशियाशी केलेल्या करारामुळे २०१६ पासून अमेरिका याबाबत अस्वस्थ आहे.
- रशियाशी एस -४०० ट्रायम्फ एन्टी-एअरक्राफ्ट क्षेपणास्त्र प्रणाली करार केल्याने भारतावर अमेरिकेच्या कॅट्सा कायद्यानुसार निर्बंध येऊ शकतात. या कायद्यानुसारच अमेरिकेने चीन आणि टर्कीवर निर्बंध घातलेले आहेत.
कॅट्सा (Countering America’s Adversaries through Sanctions Act):
- २०१७ मध्ये हा कायदा अमेरिकेने बनवला.
- दंडात्मक उपायांद्वारे इराण, रशिया आणि उत्तर कोरियाचा मुकाबला करणे हा मुख्य उद्देश.
- कायद्यातील तरतुदींपैकी एक तरतुद रशियातील संरक्षण उत्पादक कंपन्यांसोबत करार करणार्या देशांना लक्ष्य करण्याची आहे.
- भारताने रशियाबरोबर संरक्षण भागीदारी कमी केल्यास हे निर्बंध लावण्यात येणार नाहीत अशी तरतूद अमेरिकेच्या संरक्षण कायद्यात ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना टाकण्यात आली आहे.
कोणते निर्बंध लादले जातील? :
- कर्ज देण्यावर बंदी.
- निर्यातीसाठी निर्यात-आयात बँक सहाय्यावर प्रतिबंध.
- अमेरिकन सरकार सदर देशाकडून वस्तू किंवा सेवा खरेदी करणार नाही.
- व्हिसा नाकारणे.