कुवेतच्या महिलांना लष्करात भरती होण्यासाठी परवानगी

कुवेतच्या महिलांना लष्करात भरती होण्यासाठी परवानगी

  • कुवेतच्या पोलिस दलात संधी मिळाल्यानंतर महिलांना आता लष्करात भरती होण्याची संधी दिली आहे.
  • कुवेतचे उपपंतप्रधान शेख हमाद जाबेर अल-अली सबाह यांनी घोषणा केली.
  • लष्करात भरती होण्यापूर्वी महिलांना प्रारंभी वैद्यकीय आणि लष्करी मदत या विभागात सेवा करावी लागेल.
  • कुवेतमधील महिला गेल्या दोन दशकापासून पोलिस दलात काम करत आहेत.
  • २००५ मध्ये कुवेतने महिलांना मतदानाचा हक्क आणि लोकनियुक्त कार्यालयातील प्रतिनिधीत्वासाठी निवडणूक लढवण्यासाठी परवानगी दिली होती.
  • यामुळे आतापर्यंत चार महिला उमेदवारांनी संसदेत मानाचे स्थान पटकावले आहे.
  • संसेदत ५० जागा आहेत.
  • महिला न्यायाधीशांची संख्याही वाढवली आहे. आता १५ न्यायाधीश आहेत.

Contact Us

    Enquire Now