काश्मिरात कारवायांसाठी अतिरेक्यांकडून नव्या ॲपचा वापर
- पाकिस्तानमधील अतिरेकी संघटना व त्यांचे म्होरके युवकांना भडकवण्यासाठी नवीन ॲपचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे.
- या ॲपची गती कमी असली तरी, टूजी कनेक्शनवरही हे ॲप काम करते. विशेष म्हणजे २०१९मध्ये जम्मू-काश्मिरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर तेथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती व एक वर्षानंतर टूजी सेवा सुरू केली गेली तेव्हा या ॲपचा मोठ्या प्रमाणात वापर झाला.
- युवकांना कट्टरपंथी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या ॲपमध्ये फोन नंबर अथवा इ-मेल देण्याची गरज नाही, यामुळे वारकर्त्याची ओळख पूर्णपणे गोपनीय राहते.
- या तीन ॲपची माहिती मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना चकमकीनंतरचे पुरावे उपयोगी आले. यातील एक अमेरिकन कंपनीचे, दुसरे युरोपच्या तर तिसरे तुर्की कंपनीचे आहे.
- अतिरेकी गट पाकिस्तानमधील म्होरक्यांशी संपर्क साधण्यासाठी सतत या ॲपचा वापर करत आहेत. जम्मू-काश्मिरमध्ये अशा ॲपचा वापर थांबवण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणा करत आहेत.