काशी-विश्वनाथ मंदिर नूतनीकरण आणि विस्तार

काशी-विश्वनाथ मंदिर नूतनीकरण आणि विस्तार

  • काशी विश्वनाथ कॉरिडॉर या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे डिसेंबर २०२१ मध्ये करण्यात आले.
  • या प्रकल्पांतर्गत – काशी विश्वनाथ मंदिर आणि वाराणसीतील गंगा घाटांना जोडता येणार आहे.

काशी – विश्वनाथ कॉरिडॉरविषयी

  • या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. हा टप्पा ३३९ कोटींचा असून त्याचा विस्तार ५ लाख चौरस फूटांत पसरलेला आहे.
  • या प्रकल्पाची पायाभरणी २०१९ मध्येच करण्यात आली होती. प्रकल्पाला एकूण खर्च ८०० कोटी रुपये येणार आहे.
  • पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ४० हून अधिक प्राचीन मंदिर या प्रकल्पाच्या कामादरम्यान आढळून आली आहेत. या मंदिरांच्या मूळ रचनेत कोणताही बदल न करता त्यांच पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.

Contact Us

    Enquire Now