कांदा साठवणूक मर्यादा वाढवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्र सरकारला पत्र
- कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा 25 मेट्रिक टनांवरून 1500 मेट्रिक टन करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.
- कांदा खरेदीनंतर त्याचा दर्जा ठरवून पोत्यात भरण्यासाठी केंद्राने अवघ्या तीन दिवसांचा कालावधी दिला असून तो वाढवून सात दिवस करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.
- तशी मागणी करणारे पत्र त्यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण, खाद्य आणि सार्वजनिक वितरणमंत्री पियुष गोयल यांना पाठवले आहे.
- केंद्र शासनाने 23 ऑक्टोबर 2020 रोजी जीवनावश्यक वस्तू कायद्यातील नियंत्रण आदेशात सुधारणा करून घाऊक कांदा व्यापाऱ्यांसाठी 25 मेट्रिक टन तर किरकोळ कांदा व्यापाऱ्यांसाठी फक्त 2 मेट्रिक टनांपर्यंत साठवणुकीचे निर्बंध घातले आहेत.
- यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापारी दोघांनाही अडचण निर्माण होत आहे.
- रब्बी कांदा उत्पादनात महाराष्ट्र देशातील अग्रगण्य राज्य असून एकूण उत्पादनाच्या ⅓ उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते.
- तसेच देशाच्या एकूण कांदा निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा 80% आहे.
- मागील रब्बी हंगामातील कांदा उत्पादनाचे क्षेत्र वाढले असून अंदाजे 100 लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन झाले.
- या वर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अशा कांदा उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले.
- 23 ऑक्टोबर 2020 च्या अधिसूचनेनुसार कांद्याच्या आयातीला साठवण मर्यादेतून सूट देण्यात आली आहे.
- फक्त 25 मेट्रिक टन साठवणुकीच्या मर्यादेमुळे सध्या ARMC मधील कांदा व्यापारांनी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणे थांबवले असून त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होत आहे.
महाराष्ट्राची निर्यात :
- महाराष्ट्र राज्य हे देशाचे ‘फ्रूट बाऊल’ म्हणून ओळखले जाते.
- राज्यांमध्ये भाजीपाल्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
- द्राक्षे, आंबा, डाळिंब, संत्री, मोसंबी, आवळा, चिकू, पेरू, पपई, सिताफळ, कांदा, टोमॅटो, वांगी, भेंडी, कोबी, वाटाणा, हिरवी मिरची, शेवग इ. फळे आणि भाजीपाल्याच्या उत्पादनात आणि निर्यातीत महाराष्ट्र अग्रेसर आहे.
- राज्याला व्यापारासाठी बॉम्बे पोर्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) यांसारखे दोन आंतरराष्ट्रीय दर्जाचे समुद्री पोर्ट उपलब्ध असून मुंबई्, पुणे, औरंगाबाद, नागपूर यांसारखीआंतरराष्ट्रीय विमानतळ उपलब्ध आहेत.
- महाराष्ट्र राज्य कृषी मालाच्या निर्यातीत देशात अव्वल स्थानावर असून 2016-17 या वर्षामध्ये महाराष्ट्रातून फळे-भाजीपाला व इतर शेतमाल आणि प्रक्रिया पदार्थ यांची निर्यात 205 लाख मेट्रिक टन झाली होती.
- तर या निर्यातीतून 1 लाख रूपयांचे परकीय चलन प्राप्त झाले.