कांताबाई सातारकर (तमाशासम्राज्ञी)
जन्म – १९३९ (सातारा)
मृत्यू – २५ मे २०२१ (संगमनेर)
- वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी नवझंकार कलामेळ्यातून रंगमंचावर पदार्पण केलेल्या तमाशासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे कोरोनाने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या.
- १९५४ मध्ये तुकाराम खेडकरशी विवाह झाला. तुकाराम खेडकर यांनी १९७० च्या सुमारास कांताबाई सातारकर यांच्यासह मास्टर रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ या नावाने स्वत:चा तमाशा फड सुरू केला.
- उत्तम अभिनेत्री, गायिका, वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक विविध भूमिकेतून तमाशा क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले.
- मराठी रंगभूमीवर पुरुष स्रियांची भूमिका करतात पण कांताबाईंनी पुरुषाची भूमिका साकारली होती. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका हुबेहू.ब वठवल्या.
- १९६४ मध्ये अचानक तुकाराम खेडकरांचे निधन झाले आणि कांताबाईंची अवस्था बिकट झाली. दुसऱ्याच्या फडात काम करावे लागले होते.
- कोंढाण्यावर स्वारी या वगनाट्यात त्यांनी साकारलेली जिजामातेची भूमिका रसिकांच्या मनात स्मरणात राहिली, या भूमिकेबद्दल माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना सन्मानित केले होते.
- सन २००५ मध्ये विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाचा राज्य सरकारचा पहिला जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
- दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची लोककला हा तमाशा सादर करण्याचा मान त्यांना मिळाला होता.