कसोटी सामन्यातील विजयाला ५० वर्षे पूर्ण
- १९७१ मध्ये भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजला त्यांच्यात भूमीवर १.० ने पराभूत करून भारतीय संघाने विजय मिळविला.
- १९७१ ह्या वर्षी मिळवलेला विजय भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला.
- १९ एप्रिल १९७१ या दिवशी कॅरेबियन भूमीवरील भारताच्या ऐतिहासिक पराक्रमाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत.
- अजित वाडेकर यांच्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपविली तर उपकर्णधारपद श्रीनिवास वेंकटराघवन यांच्याकडे सोपवले.
- सुनिल गावस्कर नामक ध्रुवताऱ्याचा उदयही याच मालिकेत झाला.
- सुनिल गावस्करने मालिकेत तीन शतके आणि एक द्विशतकासह सर्वाधिक ७७४ धावा काढल्या होत्या.
- दिलीप सरदेसाई यांचेही या मालिकेत महत्त्वाचे योगदान होते.
- दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे झाला. याच सामन्यात भारताने पहिला कसोटी विजय मिळविला.
- याच विजयामुळे भारताला मालिकेवर प्रभुत्व मिळविता आले.
भारताकडून सर्वाधिक धावा
- सुनिल गावस्कर – ७७४
- दिलीप सरदेसाई – ६४२
- एकनाथ सोलकर – २२४
भारताकडून सर्वाधिक बळी
- एस. वेंकटराघवन – २२
- विशनसिंग बेदी – १५
- ईशपल्ली प्रसन्न – ११