कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द –
- पुणे, मुंबईसह पाच जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असलेल्या कराड जनता सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला.
- रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर सहकार आयुक्तांनी बँकेची दिवाळखोरी स्पष्ट करत बँक अवसायनात गेल्याचे जाहीर केले.
- बँकेवर उपनिबंधक मनोहर माळी यांची अवसायनिक म्हणून नियुक्तीही सहकार आयुक्तांनी केली आहे.
कराड जनता सहकारी बँकेबद्दल –
- स्थापना – 1962 मध्ये
- 1986 मध्ये बँकेला बँकिंगचा परवाना मिळाला.
- सामान्यांची बँक म्हणून पश्चिम महाराष्ट्रात नावारूपास आली.
- 1989 मध्ये बँकेत सत्तांतर होऊन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-वाठारकर यांचे पॅनेल बँकेत निवडून आले.
- 2017 मध्ये रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आले.
- 6 ऑगस्ट 2019 रोजी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले.
- 2017 ते 2019 निर्बंधाच्या काळात बँकेत अनेक नियमबाह्य कामे झाली.
- नियमबाह्य कामे केल्याचे रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आल्यानंतर बँकेचा बँकिंग परवानाच रद्दचा आदेश रिझर्व्ह बँकेने दिला.
- कराड जनता सहकारी बँकेच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे दोन विस्तारित कक्षासह 29 शाखा आहेत.
- बँकेचे 32 हजार 269 सभासद आहेत.
- रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशानुसार बँकेत पाच लाखांच्या आतील ठेवीदारांचे पैसे परत केले जाणार आहेत. मात्र त्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
ठेवीदारांसह संस्थाही अडचणीत –
- बँकेत ठेवीदारांच्या 511 कोटी 39 लाख 8 हजार, तर 1727 विविध संस्थांच्या 66 कोटी 94 हजारांच्या ठेवी.
- पाच लाखांपेक्षा कमी ठेवी असणाऱ्यांची संख्या 2 लाख 2 हजार 716 इतकी. त्यांच्या एकूण 429 कोटी 43 लाख 67 हजारांच्या ठेवी.
- तर पाच लाखांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्यांची संख्या 587 असून त्यांच्या 81 कोटी 495 लाख 41 हजारांच्या ठेवी आहेत.
- 1727 संस्थांपैकी 1382 संस्थांच्या 13 कोटी 26 लाख 76 हजारांच्या ठेवी पाच लाखांपेक्षा कमी.
- पाच लाखांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या एकूण 345 संस्था असून त्यांच्या एकूण ठेवी 52 कोटी 71 लाख 18 हजार इतक्या आहेत.
- त्यामुळे ठेवीदारांसह संस्थाही अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.