कंगनाच्या बंगल्यावरील कारवाई बेकायदा, उच्च न्यायालयाचा निर्णय
- अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बंगल्यावरील कारवाई सूडबुद्धीने केल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण
- कंगनाला बजावलेली नोटिस बेकायदा असून अशा नोटिसा बांधकाम सुरू असताना बजावल्या जातात.
न्यायालय काय म्हणाले?
- एखाद्या नागरिकाने बेजबाबदार वक्तव्ये करून कितीही मूर्खपणा केला तरी सरकार आणि प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य.
- ती वक्तव्ये कितीही त्रासदायक असली तरीही प्रशासन कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन वा बळाचा वापर करून कारवाई करू शकत नाही.
- महापालिकेची कारवाई कायद्याच्या चौकटीत नव्हती, तर नागरिकांच्या अधिकारांविरोधात होती.
- बेकायदा आणि राजकीय रंग असलेली कारवाई सरकार व सरकारी यंत्रणांकडून केली जाणे अधिक गंभीर आहे, त्याकडे दुर्लक्ष करणे समाजाचे नुकसान करणारे असेल.