औरंगाबाद व्याघ्रजननाचे नवे केंद्र

औरंगाबाद व्याघ्रजननाचे नवे केंद्र 

  • ना कडाक्याची थंडी, ना रखरखता उन्हाळा अशा अनुकूल हवामानामुळे औरंगाबाद व्याघ्रजन्मदर वाढीसाठी चांगले ठिकाण असल्याची पुष्टी मिळत आहे.
  • औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानात सुरुवातीला पंजाबमधील चतबीर प्राणिसंग्रहालयातून वाघांचे दाेन नर व दोन माद्या आणण्यात आल्या होत्या.
  • या दोन जोडप्यांपासून 25 ते 30 वर्षांत 40 वाघांचा जन्म झालेला आहे.
  • यातील सोळा वाघ हे मध्यप्रदेशातील इंदोर, सतना, टाटा प्राणिसंग्रहालय मुंबई, पुणे, बोरिवली येथील प्राणिसंग्रहालयास देण्यात आले आहेत.
  • वयोमानापरत्वे दहा वाघांचा मृत्यूही झाला आहे.
  • औरंगाबादेतील समृद्धी वाघीण तिसऱ्यांदा प्रसुूत झालेली असून तिने पाच बछड्यांना जन्म दिलेला आहे, तर यापूर्वीच्या प्रसूतीदरम्यान सात बछड्यांना जन्म दिलेला आहे.
  • सिद्धार्थ उद्यानात वाघांची संख्या एकूण 14 झाली असून त्यात एक पांढरा वाघही आहे.
  • औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानाचे विस्तारित स्वरूप पाडेगाव येथील सफारी पार्कमध्ये करण्यात येणार आहे.

 

महत्वाचे मुद्दे – 

 

  • महाराष्ट्रात 2018च्या चौथ्या व्याघ्रगणनेनुसार वाघांची संख्या – 312 
  • देशभरातील एकूण वाघ – 2196
  • सर्वाधिक वाघांची संख्या असलेली राज्य – 
राज्य 2014 2018
मध्य प्रदेश 308 526
कर्नाटक 406 524
उत्तराखंड 340 442
महाराष्ट्र 190 312
तमिळनाडू 229 264

 

महाराष्ट्र एकूण सहा व्याघ्र प्रकल्प – 

 

  1. ताडोबा, व्याघ्र प्रकल्प,चंद्रपूर
  2. पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर
  3. मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती
  4. नवेगाव-नागझीरा व्याघ्र प्रकल्प, गोंदिया
  5. बोर व्याघ्र प्रकल्प, वर्धा
  6. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्चिम घाट

Contact Us

    Enquire Now