ओदिशा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पेपरलेस होणार
- ओदिशा सरकारने या वर्षीचे अधिवेशन डिजिटल माध्यमातून करण्याचा निर्णय घेत पेपरलेस कारभाराच्या दृष्टीने आणखी एक पुढचे पाऊल टाकले आहे. याबाबतची माहिती ओदिशा विधानसभा अध्यक्ष सूर्या नारायण पत्रा यांनी दिली.
- ओदिशा विधानसभेचे हे अर्थसंकल्पीय पेपरलेस अधिवेशन फेब्रुवारीत सुरू होणार आहे. यामध्ये सभागृहातील सदस्य हे अधिवेशनाला त्यांच्या सभागृहातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील. यामध्ये आमदारांना ‘नावा ॲप्स’ (इ-विधान ॲप्लिकेशन)च्या माध्यमातून ऑनलॉईन प्रश्न विचारण्याची सुविधा देण्यात आली आहे.
- दरम्यान विधानसभेच्या आधुनिकीकरणासाठी विधानसभा अध्यक्षांनी जवळपास ८.५६ कोटी रुपये खर्च आला असल्याचे सांगितले. यामध्ये केंद्र-राज्य वाटा ६० :४० असा आहे.
- या अधिवेशनाचे संपूर्ण कामकाज मोबाईल ॲपच्या माध्यमातून चालणार आहे. तसेच राज्याचा अर्थसंकल्पदेखील ऑनलाईन पद्धतीने मांडला जाणार आहे. राज्याचे वित्तमंत्री निरंजन पुजारी हा अर्थसंकल्प सादर करतील. ‘नावा ॲप्स’च्या वापरासाठी सर्व सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- पेपरलेस अधिवेशन घेणारे अरुणाचल प्रदेश हे पहिले राज्य आणि दुसरा प्रयोग ओदिशा राज्य करत आहे. अधिवेशन पेपरलेस करण्याच्या निर्णयाचे सर्व सदस्यांनी स्वागत केले.
- कार्यालयातील फाईल्स कामासंदर्भात (डिजिटल) ओदिशा कंप्यूटर ॲप्लिकेशन सेंटर विधानसभा कर्मचाऱ्यांना ओदिशा सचिवालय वर्क फ्लो ऑटोमेशन सिस्टिमवर ऑनलाईन प्रशिक्षण देणार आहे, यासाठीची प्रक्रियाही पूर्ण झाल्याचे पात्रा यांनी सांगितले.