
‘ऑपरेशन ग्रीन’साठी रेल्वेला १० कोटी
- कृषीमालाच्या वाहतुकीस प्राेत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार किसान रेल्वेने वाहतूक करणाऱ्यांना वाहतूक भाड्यात ५० टक्के सवलत देत आहे. त्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय रेल्वेकडे १० कोटी जमा करण्यात आले आहेत.
ऑपरेशन ग्रीनविषयी
- केंद्र सरकारने कोविड १९ शी सामना करण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचे आत्मनिर्भर अभियान घोषित केले होते. अडचणीत आलेल्या कृषी क्षेत्राला आधार देण्यासाठी याच अभियानाच्या अखत्यारीत ‘ऑपरेशन ग्रीन’ लागू केले गेले आहे. शेतकरी व प्रक्रिया उद्योगांना निवडक शेतीमालाची साठवणूक व वाहतुकीसाठी अनुदान देण्याचा मुख्य हेतू या योजनेमागे आहे.
- केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून अधिसूचित पिकांच्या वाहतुकीसाठी ५० टक्के अनुदान दिले जात आहे. उत्पादन समूह ते वापर केंद्रापर्यंत होणाऱ्या अधिसूचित पिकाच्या वाहतुकीसाठी अनुदान असेल. तसेच कमाल तीन महिन्यांपर्यंतच्या साठवणुकीसाठीदेखील अनुदान दिले जाणार आहे. संबंधित मालाचे तीन वर्षांचे बाजारभाव गेल्या हंगामात १५ टक्क्यांनी घसरले असल्यास सदर पीक या योजनेस पात्र धरले जात असते.