ऑक्सिजनसाठी ‘पीएम केअर’
- देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना पीएम केअर्स निधीतून देशातील सरकारी रुग्णलयांत 551 प्राणवायू निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.
- या वैद्यकीय कारणासाठी लागणारा प्राणवायू सरकारी रुग्णालयांच्या प्रकल्पातच तयार होणार आहे.
- स्विंग ॲण्ड स्पॉर्प्सन (अधिशोषक) पद्धतीचे हे प्रकल्प असणार आहेत.
- हे प्रकल्प प्राणवायू उपलब्धता वाढवणार असून जिल्हा पातळीवर त्याचा फायदा होणार आहे.
- हे प्राणवायू निर्मितीसाठी समर्पित असे प्रकल्प असतील तसेच राज्ये व केंद्रशासित प्रदेशात जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
- पीएम केअर निधीतून यंदाच्या वर्षी आधीच 201.58 कोटी रुपये पीएसए प्राणवायू प्रकल्पांसाठी मंजूर करण्यात आले होते.
- त्यातील तरतूद ही 161 प्रकल्पांसाठी होती.
- सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या ठिकाणी या प्राणवायू प्रकल्पांना परवानगी देण्यात आली होती.
प्रत्येक जिल्हा रुग्णालयात सुविधा
- पीएसए प्राणवायू प्रकल्प सुरू करण्यामागे मुख्य उद्देश हा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सरकारी रुग्णालयात प्राणवायू पुरवठा सुरळित ठेवणे हा आहे.
- प्रत्येक जिल्हा रुग्णालयात अशी प्राणवायू क्षमता ठेवली जाणार आहे.
- ही रुग्णालये स्वतःच त्यांची गरज भागवू शकेल एवढा प्राणवायू तयार करू शकतील.
- वैद्यकीय प्राणवायू हा वेगळा राहील.
- प्रदीर्घ काळ ही यंत्रणा सुलभपणे चालू शकेल व त्यामुळे आजारी रुग्णांना अखंडपणे प्राणवायू पुरवठा करता येणार आहे.