एसडीजी इंडिया इंडेक्स – २०२० – २१
- नीती आयोगाने ३ जून २०२१ रोजी शाश्वत विकास उद्दिष्टे भारत निर्देशांक अर्थात Sustainable Development Goals India Index (SDG India) जाहीर केला.
- २०२०-२१ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या निर्देशांकाचे हे तिसरे वर्ष आहे.
- या निर्देशांकामध्ये केरळने प्रथम स्थान कायम राखले, तर बिहार, झारखंड आणि आसाम सर्वात वाईट कामगिरी करणारे राज्ये ठरली.
SDG India Index – २०२०-२१
- हा निर्देशांक सर्वात प्रथम डिसेंबर २०१८ मध्ये प्रकाशित करण्यात आला.
- शाश्वत विकास ध्येये हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक महत्त्वाकांक्षी जाहिरनामा आहे. त्यात गरिबी, भूक, तसेच इतर महत्त्वाचे असे १७ ध्येये स्विकारण्यात आले आहे.
- संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सर्व १९३ सदस्य देशांनी सप्टेंबर २०१५ मध्ये एकमताने स्विकारलेल्या या जाहिरनाम्यानुसार २०१५ ते २०३० या पंधरा वर्षांच्या काळात संकल्पित विकास घडवून आणणे अपेक्षित आहे.
- भारतातील वेगवेगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शाश्वत विकासाच्या दिशेने किती प्रगती होते आहे. त्यासाठी नीती आयोगाने राष्ट्रीय स्तरावर SDG India Index जाहीर करण्यास सुरुवात केली. (सहकार्य – संयुक्त राष्ट्रे)
महत्त्वाचे
- राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी १७ शाश्वत विकास ध्येयांबाबत कामगिरीच्या आधारे मुल्यांकन केले जाते. व त्यानुसार ० ते १०० गुण दिले जातात. या गुणांच्या आधारे खालील वर्गीकरण करण्यात आलेले आहे.
१) आकांक्षित (apirant) : ० – ४९
२) प्रयत्न करणारे (Performer) : ५० – ६४
३) आघाडीवरचे (Front – Runner) : ६५ – ९९
४) प्राप्तकर्ता (Achieve) : १००
एकूण निकाल आणि निष्कर्ष
- देशाच्या एकूण एसडीजी ६ गुणांनी सुधारला. (२०१९ मध्ये ६० पासून ते २०२०-२१ मध्ये ६६ पर्यंत)
- केरळने ७५ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले तर हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांनी ७४ गुणांसह दुसरे स्थान पटकावले.
- महाराष्ट्राने ७० गुणांसह पाचवे स्थान पटकावले.
- बिहार, आसाम आणि झारखंड सर्वात वाईट कामगिरी करणारी शेवटची तीन राज्ये ठरली.
- चंदिगडने केंद्रशासित प्रदेशांत प्रथम स्थान राखले.
पहिली पाच सर्वोत्तम राज्ये
१) केरळ (७५)
२) हिमाचल प्रदेश, तमिळनाडू (७४)
३) आंध्रप्रदेश, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड (७२)
४) सिक्किम (७१)
५) महाराष्ट्र (७०)
शेवटची पाच राज्ये
५) छत्तीसगड, नागालँड, ओदिशा (६१)
४) अरुणाचल प्रदेश, मेघालय, राजस्थान, उत्तरप्रदेश (६०)
३) आसाम (५७)
२) झारखंड (५६)
१) बिहार (५२)