एसएस कल्पना चावला

एसएस कल्पना चावला

  • 1 ऑक्टोबर 2020 रोजी नासाने Northrop Grumman Cygnus resupply हे यान प्रथम भारतीय वंशाच्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देऊन अवकाशात सोडले.
  • हे यान अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रांतामधील वेलोप फ्लाईट केंद्र येथून अवकाशात झेपावले. एसएस कल्पना चावला यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर 8000 पौंड वजनाचे विविध सामान घेऊन जाणार आहे. हे यान नासाच्या अंतारेस रॉकेटच्या मदतीने सोडले जाणार आहे.
  • यानावर शार्कसेट हा 5G  तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेला उपग्रहही बसवण्यात आला आहे.  तसेच हे यान इलेक्ट्रॉनिक अमोनिया रिमूव्हल सिस्टम, 360 डिग्री व्हर्च्युअल कॅमेरा, युनिव्हर्सल वेस्ट मॅनेजमेंट सिस्टिम इत्यादी यंत्रे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेणार आहे.

कल्पना चावलांबद्दल:

  • कल्पना चावला ह्या अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला होत्या. 2003 साली अंतराळातील कामगिरी पूर्ण झाल्यानंतर पृथ्वीवर परत येत असताना त्यांच्या यानाचा अपघात होऊन त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताला ‘कोलंबिया आपत्ती’ असेही म्हणतात.

Contact Us

    Enquire Now