एम. व्ही. एशियाटिक मून : नवी जहाज वाहतूक सेवा

एम. व्ही. एशियाटिक मून : नवी जहाज वाहतूक सेवा

  • ३ जुलै, २०२० रोजी पेट्रापोल-बेनापोल भू-बंदरमार्गे सीमापार व्यापार वारंवार विस्कळित होत असताना, श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट [पूर्वीचे कोलकाता पोर्ट ट्रस्ट] ने भारत-बांग्लादेश प्रोटोकॉल मार्गाद्वारे भारत-बांगला व्यापारात वाढ करण्याच्या उद्देशाने कोलकाता डॉक सिस्टिम (केडीएस) आणि चॅटोग्राम (बांगलादेश) दरम्यान नवीन कंटेनर वाहतूक सेवा सुरू केली आहे.
  • कंटेनर शिप ‘एम.व्ही. एशियाटिक मून (सिंगापूर ध्वज) भारतीय निर्यातीतील ३०० कंटेनर बांगलादेशात नेण्याची अपेक्षा आहे. 
  • बंगाल टायगर लाइन्स यांच्या संयुक्त विद्यमाने झीम इंटिग्रेटेड सर्व्हिसेसने ही नवीन सेवा सुरू केली असून एसपीएमपीटीचे उपाध्यक्ष एस. बालाजी अरुणकुमार यांच्या हस्ते तिचे उद्घाटन झाले. 
  • सर्व निर्यातदारांना नवीन सेवेची जाणीव करून देण्यासाठी शिपिंग लाइन एफआयईओ (फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन) यांच्याशी सल्लामसलत देखील करते. 
  • एम. व्ही. एशियाटिक मून : या जहाजातून फेरो मेटल अ‍ॅलॉय आणि कपड्यांची निर्यात केली जात आहे. आजपर्यंत कोलकाता आणि चॅटोग्राम दरम्यान चालणार्‍या जहाजांच्या आकारमानानुसार हे सर्वात मोठे जहाज आहे. 
  • आतापर्यंत या मार्गावर सुमारे ८०-१०० कंटेनर वाहून नेण्याची क्षमता असलेल्या केवळ छोट्या छोट्या बार्जेस कार्यरत आहेत. 
  • एम. व्ही. एशियाटिक मून चॅटोग्रामपर्यंत एकाच प्रवासामध्ये जास्तीत जास्त ६०० कंटेनर्स घेऊन जाऊ शकते. 
  • जुलै २०२० च्या दुसर्‍या आठवड्यात एक्स्प्रेस चालवणार्‍या एमव्ही एक्स्प्रेस गोदावरीचे दुसरे सामानवाहू जहाज केडीएस येथून सुरू होईल. 

बांगलादेश बद्दल : राजधानी-ढाका, चलन- बांग्लादेशी टका, अध्यक्ष- अब्दुल हमीद, पंतप्रधान-शेख हसीना

Contact Us

    Enquire Now