एमपीएससीकडून स्पर्धा परीक्षांसाठी उमेदवारास संधीची कमाल मर्यादा निश्चित
- स्पर्धा परीक्षांद्वारे राज्यसेवा आयोगामार्फत विविध शासकीय पदे भरण्यात येतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारास संधीची कमाल मर्यादा निश्चित केली आहे.
- आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेल्या घोषणापत्रात एमपीएससीमार्फत रिक्त पदांसाठी सुयोग्य उमेदवारांच्या शिफारसी संदर्भात राबविण्यात येणाऱ्या निवडप्रक्रियांमध्ये वेळोवेळी करावयाच्या विविध सुधारणांच्या उपाययोजनांपैकी एक म्हणजे स्पर्धा परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांची संख्या मर्यादित करणे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
- विभिन्न स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारास आयोगाने खालीलप्रमाणे संधीची कमाल मर्यादा निश्चित केली आहे.
- खुल्या (अराखीव) उमेदवारास कमाल सहा संधी उपलब्ध राहतील.
- SC/ST प्रवर्गातील उमेदवारास कमाल संधींची मर्यादा लागू नाही.
- उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारास कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील.
- यासोबतच पूर्व परीक्षेसाठी एखाद्या उमेदवाराने अर्ज केला व परीक्षेला बसला (हजर) असल्यास त्याचा अटेम्ट मोजला जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
- एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याचा अटेम्प्ट मोजला जाईल.
- कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यासही त्याचा अटेम्प्ट मोजला जाईल.
- आयोगाने घेतलेला हा निर्णय २०२१ मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी लागू होणार असल्याचे नमूद केले आहे.
थोडक्यात एमपीएससी
- स्थापना – १ मे १९६०
- मुख्यालय – मुंबई
- घटनेच्या कलम ३१५ नुसार आयोग निर्माण. कलम ३२० नुसार आयोग सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य करतो.