एमजीएम स्टुडिओची ॲमेझॉनकडून खरेदी
- शेकडो दर्जेदार चित्रपट आणि लघुपटांचा मालकी हक्क असलेल्या ‘एमजीएम’ स्टुडिओची खरेदी करण्याची तयारी ॲमेझॉन कंपनीने दाखविली असून ८ अब्ज ४५ कोटी डॉलर्सला हा खरेदी व्यवहार होणार आहे.
- गेल्या काही काळात ‘ॲमेझॉन प्राइम’च्या माध्यमातून ऑनलाइन स्ट्रीमिंगच्या क्षेत्रात प्रचंड दबदबा निर्माण केलेल्या ॲमेझॉनच्या हाती या खरेदी व्यवहारामुळे चित्रपटांचा प्रचंड मोठा साठा लागणार आहे.
- १७ एप्रिल १९२४ला स्थापन झालेल्या म्हणजेच शतकाकडे वाटचाल करत असलेल्या मेट्रो गोल्डविन मेयर, म्हणजेच ‘एमजीएम’ स्टुडिओबरोबर खरेदी व्यवहार करण्याबाबतचा करार झाल्याचे ॲमेझॉन कंपनीने जाहीर केले.
- या करारानंतर ‘ॲमेझॉन प्राइम’ची ताकद वाढणार आहे. ऑनलाइन विक्री आणि क्लाऊड कॉम्प्यूटिंगमध्ये ॲमेझॉनचा व्यवसाय तेजीत असून मनोरंजन क्षेत्रातही त्यांच्या ग्राहकसंख्येचा आलेख उंचावतच आहे.
- हॉलीवूडमध्ये प्रतिष्ठा असलेल्या ‘एमजीएम’ स्टुडिओजची मालकी गेल्या काही वर्षांत अनेक वेळा बदलली. या काळात स्टुडिओ कर्जबाजारीही झाला. त्याचाच परिणाम म्हणून हा खरेदी व्यवहार झाल्याचे सांगितले जाते.
‘एमजीएम’ कडील खजिना
१) ४००० पेक्षा अधिक चित्रपट, यामध्ये जेम्स बाँड, रोबोकॉप, रॉकी क्रीड यांचा समावेश
२) १७००० टीव्ही शो, यामध्ये द हँडमेड्स टेल, फार्गो, वायकिंग यांचा समावेश आहे.
३) १८० ऑस्कर विजेत्या कलाकृतींचा समावेश
४) १०० एमी विजेत्या कलाकृतींचा समावेश