एमएसएमईसाठी ५० कोटी डॉलर्स

एमएसएमईसाठी ५० कोटी डॉलर्स

  • कोरोना संकट आणि लॉकडाउनमुळे अडचणीत आलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योग क्षेत्राच्या मदतीसाठी भारत सरकारच्या प्रयत्नांना जागतिक बँकेने मदतीचा हात देऊ केला आहे.
  • जागतिक बँकेने यासाठी ५० कोटी डॉलर्सच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत ५.५५ लाख उद्योगांच्या कामगिरीत सुधारणा करण्याचे उद्दिष्ट आहे.
  • जागतिक बँकेचा ‘राइझिंग अँड ॲक्सलरेटिंग मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एण्टरप्राईज परफॉर्मन्स’ (आरएएमपी) हा ५० कोटी डॉलर्सचा दुसरा प्रकल्प आहे.
  • आशियाच्या एमएसएमई इमर्जन्सी रिस्पॉन्स प्रोग्रॅममध्ये ७५ कोटी डॉलर्सच्या प्रकल्पाला मागील वर्षी जुलैमध्ये मंजुरी देण्यात आली होती.
  • लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या कर्जाची गरज आणि रोख निधीची चणचण दूर करण्यासाठी या प्रकल्पाद्वारे साहाय्य करण्यात आले. याअंतर्गत आतापर्यंत ५० लहान मोठ्या उद्योगांना सरकारी योजनेतून अर्थसाहाय्य मिळाले होते.

Contact Us

    Enquire Now