
एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत ५८.३७ अब्ज डॉलर्स एफडीआय चा ओघ
- थेट परकीय गुंतवणूक (एफ.डी.आय) ही आर्थिक विकासाचे प्रमुख साधन असून भारतासाठी कर्जाशिवाय आर्थिक पाठबळ पुरवणारा महत्त्वाचा स्रोत आहे.
- गुंतवणूकदार स्नेही एफडीआय धोरण राबवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशातले थेट परदेशी गुंतवणूक धोरण अधिक गुंतवणूकदार स्नेही व्हावे आणि धोरणातल्या गुंतवणुकीला अडथळा ठरणाऱ्या गोष्टी दूर करणे हा यामागचा उद्देश आहे.
- एफडीआय धोरण सुधारणांच्या आघाडीवर सरकारने केलेल्या उपाययोजना, गुंतवणूक सुलभता आणि व्यवसाय सुलभता यामुळे देशात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे.
- जागतिक गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणुकीचे पसंतीचे स्थान म्हणून भारताला स्थान मिळाले आहे.
- वित्तीय वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यात (एप्रिल ते नोव्हेंबर २०२०) ५८.३७ अब्ज अमेरिकी डॉलर्स थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ प्राप्त झाला असून २०१९-२० या वर्षातल्या पहिल्या आठ महिन्यांशी तुलना करता २२% अधिक आहे.