एडवर्ड ओ. विल्सन

एडवर्ड ओ. विल्सन

जन्म – १९२९ बर्मिंगहॅममध्ये (अमेरिका)

निधन – २६ डिसेंबर २०२१

जीवनपरिचय –

  • संशोधक असूनही शैलीदार लतितेदार लिखाणाबद्दल दोन पुलित्झर पारितोषिक जिंकणारे, निसर्ग अभ्यासक असूनही धर्माशी फारकत न घेणारे पृथ्वी वाचवण्यासाठी विज्ञानवादी आणि धर्मवादी मंडळींना एकत्रित आणणारे विल्सन यांचे निधन झाले.
  • मुंग्यांविषयी प्राधान्याने संशोधन करताना, त्यांच्या स्वभाव गुणांच्या आधारे मानवी परस्पर संबंधाचा आणि जनुकीय रचनेचा अभ्यास करून अनेक सिद्धांत मांडल्याने त्यांना ‘आधुनिक जगातील डार्विन’ म्हणतात.
  • अमेरिकेत पहिल्या ‘बाहेरून स्थलांतरित’ मुंग्यांचा शोध विल्सन यांनीच लावला.
  • त्यांचे सर्वाधिक गाजलेले संशोधन म्हणजे “मुंग्यांचे रासायनिक संज्ञापन!”
  • मुंग्यांचे वागणे जसे जनुकीय संरचनेनुसार असते तसे मनुष्याचेही असते.
  • वैज्ञानिकाने सत्याचा शोध घेतला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता व ते त्यांनी आचरणातही आणले होते.

Contact Us

    Enquire Now