एचडीएफसी बँकेच्या कार्ड वितरणावर तूर्त बंदी
- भारतीय रिझर्व्ह बँकेकडून खासगी क्षेत्राकडे अग्रेसर एचडीएफसी (HDFC) बँकेला क्रेडिट कार्डसाठी नव्याने ग्राहक मिळविण्यास तसेच नियोजित डिजिटल व्यावसायिक उपक्रम राबविण्यास तात्पुरती मनाई करणारा आदेश देण्यात आला आहे.
- डेटा सेंटरमध्ये वीजप्रवाह खंडित झाल्याचा बँकेच्या कारभारावर दिसून आलेल्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल टाकले गेले आहे.
- HDFC बँकेने नियमानुसार, भांडवली बाजाराला सूचित केल्याप्रमाणे, रिझर्व्ह बँकेने 2 डिसेंबर 2020 रोजी गेल्या दोन वर्षात इंटरनेट बँकिंग, मोबाईल तसेच देयक व्यवहार वारंवार खंडित होण्याच्या विशिष्ट प्रकरणांच्या संबंधाने हा आदेश बजावला आहे.
- HDFC बँकेने डिजिटल 2.0 कार्यक्रमाअंतर्गत आखलेल्या नियोजनाप्रमाणे सर्व व्यावसायिक उपक्रमांचे अनावरण आणि सुरुवात तसेच अन्य प्रस्तावित माहिती-तंत्रज्ञान उपयोजनांना तात्पुरते स्थगित करावे आणि क्रेडिट कार्डसाठी नवीन ग्राहक मिळवणेही थांबवावे, असेही रिझर्व्ह बँकेने याबाबतच्या आदेशात म्हटले.
एचडीएफसी बँकेला मूल्य घसरण फटका –
- HDFC बँकेचे समभागमूल्य 3 डिसेंबर 2020 रोजी 2.13 टक्क्यांनी घसरले.
- व्यवहारात प्रति समभाग 1374.25 रुपयांपर्यंतचा तळ गाठल्यानंतर बँकेचे मूल्य दिवसअखेर 1377.05 रुपयांवर स्थिरावले.
- गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ (Housing development and finance corporation : HDFC) बद्दल स्थापना – 1977 मध्ये (हसमुख पटेल यांनी)
- ICICI ने त्यासाठी बहुमताचा भांडवल पुरवठा केला.
- मुख्यालय – मुंबई.
- कार्य –
- HDFC अल्प व मध्यम गटातील व्यक्ती, सहकारी संस्था इत्यादींना गृहबांधणीसाठी दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करते.