ऋषभ पंत यांची उत्तराखंडचे सदिच्छादूत म्हणून निवड
- १९ डिसेंबर २०२१ रोजी उत्तराखंड राज्याने ऋषभ पंत यांची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केली.
- उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी राज्यातील तरुणांना क्रीडा आणि सार्वजनिक आरोग्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत यांची राज्य ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली.
ऋषभ राजेंद्र पंत:
- भारतासाठी मिडल ऑर्डर विकेटकीपर बॅट्समन म्हणून खेळणारा भारतीय क्रिकेटर.
- जन्म : ४ ऑक्टोबर १९९७ (रुरकी,उत्तराखंड येथे)
- २०१५ मध्ये, त्याला २०१६ अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी भारताच्या संघात स्थान देण्यात आले होते.
- उत्तराखंड हे भारताच्या उत्तरेकडील एक महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते. डेहराडून ही उत्तराखंड या राज्याची राजधानी आहे. अनेक धार्मिक ठिकाणे व थंड हवेची ठिकाणे यामुळे येथे पर्यटन व्यवसाय भरभराटीस आला आहे. केदारनाथ, बद्रिनाथ, हरिद्वार, ऋषिकेश ही येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत.
- ९ नोव्हेंबर २००० साली उत्तरप्रदेश पासून वेगळा होऊन भारताचे २७वे राज्य म्हणून उत्तराखंडची निर्मिती झाली.
- डिसेंबर २०२१मध्ये, अभिनेता सलमान खानची महाराष्ट्राचा कोविड लसीकरण दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.