उपग्रह आणि आण्विक शस्त्रांचा वेध घेणारी आयएनएस ध्रुव
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी विशाखापट्टणम् येथे नौदल प्रमुख परमबीर सिंग यांच्या उपस्थितीमध्ये सागरी निरीक्षण नौका आयएनएस ध्रुव नौदलास अर्पण केली.
- हेरगिरी करणाऱ्या उपग्रहांचा तसेच दीर्घ पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वेध घेऊ शकणारी ही भारतातील पहिलीच नौका आहे.
- पाकिस्तान तसेच चीनमधून होऊ शकणाऱ्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांच्या बाबतीत पूर्वसूचना देण्याची क्षमता आयएनएस ध्रुव मध्ये आहे.
- या नौकेमुळे भारत हा फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, रशिया व चीन या देशांच्या यादीत जाऊन बसला आहे.
- आयएनएस ध्रुवची उपस्थिती इंडो-पॅसिफिक क्षेत्रामध्ये भारतासाठी महत्त्वपूर्ण असेल.
- समुद्राच्या तळाचा नकाशा तयार करणे तसेच शत्रूच्या पाणबुडीचा वेध घेणे ही कार्येसुद्धा हे जहाज करू शकणार आहे.
- डीआरडीओ आणि राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संघटनेच्या मदतीने आयएनएस ध्रुवची निर्मिती हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड यांनी केली आहे.
- विक संदवीक डिझाईन प्रा. लि. या नवी दिल्ली स्थित कंपनीने सदर नौकेची रचना ठरवली.
- एकाच वेळी जवळपास तीनशे लोक आयएनएस ध्रुववर थांबू शकतात. तसेच हेलिकॉप्टरला उतरण्यासाठी हेलिपॅडसुद्धा उपलब्ध आहे.
- डीआरडीओने विकसित केलेले विशिष्ट असे रडार असल्यामुळे शत्रुदेशाचे हेरगिरी करणारे उपग्रह शोधण्याची क्षमता ७५० कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या या आयएनएस ध्रुवची आहे.