उदयम नोंदणी पोर्टल कार्यरत
- सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी उदयम नोंदणी पोर्टल कार्यरत झाले असून हे पोर्टल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने विकसित केले आहे.
- २६ जून २०२० रोजी जाहीर झालेल्या अधिसूचनेनुसार उपक्रमांची वर्गवारी व नोंदणीची नवीन प्रक्रिया सुरू झाली आहे.
- ऑनलाईन नोंदणीसाठी http://udayamregmission.gov.in पोर्टल सुरू करण्यात आले.
- नवीन नोंदणीप्रक्रियेमुळे व्यवसाय सुलभीकरणला प्रोत्साहन मिळेल आणि व्यवहारासाठी लागणारा वेळ व खर्च कमी होईल.