उज्ज्वला २.०
- १० ऑगस्ट रोजी पंतप्रधानांद्वारा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा (PMUY) दुसरा टप्पा ‘उज्ज्वला २.०” उत्तर प्रदेशातील महोबा येथून सुरू करण्यात आला.
- त्यांनी जागतिक जैव इंधन दिन (१० ऑगस्ट) च्या निमित्ताने “गोबर धन” – ऊर्जेसाठी शेण वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या योजनांचा उल्लेख केला.
- उज्ज्वला हा वर्तणूक बदलाच्या महत्त्वाकांक्षी अजेंड्याचा भाग असून २०२४ पर्यंत भारताला ५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेत नेण्यास याची मदत होईल.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY):
- पहिला टप्पा:
-
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) कनेक्शन देण्यासाठी मे २०१६ मध्ये सुरू करण्यात आले.
- दुसरा टप्पा:
-
- स्थलांतरित कामगार व ज्यांना पत्त्याचा पुरावा सादर करणे कठीण वाटते अशा व्यक्तींना जास्तीत जास्त लाभ देण्याचा हेतू आहे.
- गॅस जोडणी मिळवण्यासाठी आता त्यांना फक्त आपल्या पत्त्याबाबत स्वघोषणा पत्र द्यायचे आहे.
- उद्दिष्टे:
१) महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण.
२) स्वयंपाकाच्या अशुद्ध जीवाश्म इंधनामुळे भारतातील मृत्यूंची संख्या कमी करणे.
३) जीवाश्म इंधन जाळून घरातील वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या तीव्र श्वसनाच्या आजारांपासून बालकांचे रक्षण करणे.
वैशिष्ट्ये:
- ही योजना बीपीएल कुटुंबांना प्रत्येक एलपीजी गॅस जोडणीसाठी १६०० रुपयांची आर्थिक मदत पुरवते.
- डिपॉझिट-फ्री एलपीजी कनेक्शन सोबत, उज्ज्वला २.० लाभार्थ्यांना प्रथम एलपीजी रिफिल आणि स्टोव्ह मोफत प्रदान करेल.
लक्ष्ये:
- उज्वला योजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत, मार्च २०२० पर्यंत दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांतील ५० दशलक्ष महिलांना एलपीजी जोडणी देण्याचे लक्ष्य होते. तथापि, ऑगस्ट २०१८ मध्ये, इतर सात श्रेणीतील महिलांनादेखील या योजनेच्या कक्षेत आणले गेले:
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती, प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत येणाऱ्या, अंत्योदय अन्न योजना (AAY), वनवासी, सर्वात मागासवर्गीय, चहाच्या बागा आणि बेटे हे लाभार्थी.
- उज्ज्वला २.० अंतर्गत, ४८०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त वाटपासह ५० दशलक्ष कुटुंबांच्या आधीच्या उद्देशातून ८० दशलक्ष गरीब कुटुंबांचा समावेश करण्यासाठी या योजनेची व्याप्ती करण्यात आली आहे.
- नोडल मंत्रालय: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय (MoPNG)
योजनेचे फलित:
१) उज्ज्वला योजनेचा पहिल्या टप्प्यात दलित आणि आदिवासी समुदायांसह ८ कोटी गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी मोफत एलपीजी गॅस जोडणी देण्यात आली.
२) एलपीजी पायाभूत सुविधांचा देशात अनेक पटींनी विस्तार झाला आहे. गेल्या सहा वर्षांत देशभरात ११,००० हून अधिक नवीन एलपीजी वितरण केंद्रे उघडली आहेत.
योजनेसाठी पात्रता निकष:
१) अर्जदार व्यक्ती भारतीय व १८ वर्षे पूर्ण महिला असावी.
२) ती दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबातील असावी.
३) अर्जदाराच्या घरातील इतर कोणीही एलपीजी कनेक्शन घेऊ नये.
४) कुटुंबाचे दरमहा घरगुती उत्पन्न राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशातील सरकारने परिभाषित केलेल्या विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त नसावे.
५) अर्जदार सरकारने पुरविलेल्या इतर तत्सम योजनांचा प्राप्तीकरता नसावा.