इस्रो २०२५ मध्ये फ्रान्सच्या सी एन आर एस सहभागासह “शुक्रायन – I” ला शुभारंभ करणार आहे

इस्रो २०२५ मध्ये फ्रान्सच्या सी एन आर एस सहभागासह “शुक्रायन – I” ला शुभारंभ करणार आहे

  • ३० सप्टेंबर २०२० रोजी फ्रेंच अवकाश एजन्सीने (CNES) जाहीर केले की ते इस्रोच्या व्हिनस मिशनमध्ये भाग घेणार आहेत.
  • शुक्र (Venus) ग्रहावर जीवसृष्टी असल्याच्या शक्यतेने इस्रोकडून २०२५ मध्ये शुक्रयान -I ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
  • VIRAL – Venus Infrared Atmospheric Gases Linker हे साधन रशियन फेडरल स्पेस एजन्सी Roscomos आणि Lakmos Atmosphere सह विकसित केले गेले आहे.
  • मंगळयान मिशननंतर आणि चंद्र मिशन चंद्रयान – १ आणि चंद्रयान – २ नंतर आता इस्रोने शुक्रावर नजर ठेवली आहे.
  • अंतराळ, अणु आणि संरक्षण (Space, nuclear & defence) यासारख्या मोक्याच्या क्षेत्रात भारतासोबत सहकार्य करणाऱ्या तीन देशांपैकी फ्रान्स एक आहे व इतर दोन देश अमेरिका आणि रशिया आहेत.
  • २०१८ मध्ये भारत आणि फ्रान्सने “Joint Vision for Space Corporation” जारी केला.
  • आतापर्यंत पृथ्वीवरून शुक्र ग्रहाकडे ४२ मोहिमा पाठविण्यात आल्या आहेत. जपानचे “Akatsuki” यान सध्या शुक्राभोवती फिरत आहे.
  • सप्टेंबर २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलशास्रज्ञांच्या पथकाने शुक्रच्या वातावरणात फॉस्फिन वायूची उपस्थिती शोधली.
  • युरोपीयन अंतराळ एजन्सी मिशन, व्हिनस एक्सप्रेसला यापूर्वी २०११ मध्ये व्हीनसच्या वरच्या वातावरणामध्ये ओझोनची लक्षणे आढळली होती. त्यांना बायोमार्कर (Biomarkar) मानले जाते. म्हणजेच ग्रहात जीवनाचे अस्तित्व असण्याची शक्यता आहे.

शुक्रयान – I बद्दल

  • वातावरणातील रसायनशास्र, रचनात्मक भिन्नता आणि शुक्राची गतिशीलता यांचा अभ्यास करणे हे ध्येय आहे.
  • यापूर्वी २०२३ मध्ये या अभियानाची सुरुवात होणार होती.

शुक्र ग्रह

  • शुक्र हा सौर मंडळामधील दुसरा ग्रह आहे आणि सर्वात तेजस्वी ग्रह आहे.
  • कधीकधी समान वस्तुमान आणि आकारामुळे पृथ्वीचा जुळा ग्रह म्हणून ओळखले जाते. प्रेम आणि सौंदर्याच्या रोमन देवतेवरून या ग्रहाचे नाव देण्यात आले.
  • १६०० मध्ये गॅलीलियो गॅलिली ही पहिली व्यक्ती होती जिने दुर्बिणीच्या सहाय्याने शुक्राला टिपले.
  • १९६२ मध्ये अमेरिकच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या मरिनर २ या स्पेस क्राप्टने शुक्राला पहिल्यांदा भेट दिली. आणि रडारच्या मदतीने पृष्ठभागाचे मॅपिंग केले.
  • शुक्राच्या वातावरणामध्ये कार्बनडायऑक्साइड आणि सल्फ्‍युरिक ॲसिडचे ढग आहेत.
  • शुक्राच्या पृष्ठभागावरील तापमान ४७१C पर्यंत असते.
  • पृष्ठभागावरील दाब हा पृथ्वीच्या तुलनेत ९० पट जास्त आहे.
  • पृथ्वीप्रमाणे तितक्या वेगाने शुक्र फिरत नसल्याने चुंबकीय क्षेत्र तयार होत नाही.
  • शुक्राला त्याच्या अक्षांवरील मंद फिरण्यामुळे एक चक्कर फिरण्यास पृथ्वीपेक्षा जास्त वेळ लागतो हा काळ पृथ्वीवरील २४३ दिवस इतका आहे.
  • बहुतेक ग्रह त्यांच्या अक्षांवर घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात पण युरेनस सारखाच शुक्रदेखील घड्याळ्याच्या दिशेने फिरतो.
  • शुक्राला उपग्रह नाही.
  • शुक्र पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो तर पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)

  • १५ ऑगस्ट १९६९ रोजी डॉ. विक्रम साराभाई यांच्या प्रेरणेतून कर्नाटकातील बंगळूर येथे भारतीय अवकाश संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली.
  • आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात श्रीहरीकोटा येथे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे.
  • १९ एप्रिल १९७५ रोजी कॉसमॉस – ३M प्रक्षेपकाद्वारे “आर्यभट्ट” हा भारताचा पहिला उपग्रह सोव्हिएत रशियाच्या मदतीने अवकाशात पाठवला.
  • सेक्रेटरी ऑफिस ऑफ स्पेरा – कैलासवदिवू (के) सिवन

फ्रान्सबद्दल

  • राजधानी – पॅरिस
  • चलन – युरो, सीएएफपी फ्रँक
  • अध्यक्ष – इमॅन्युएल जीन – मिशेल फ्रेडरिक मॅक्रॉन

Contact Us

    Enquire Now