इंद्र – २१ नौदल सराव
- आवृत्ती : १२ वी (त्रिसेवा सराव)
- देश : भारत आणि रशिया
- ठिकाण : व्होल्गोग्राड, रशिया
- कालावधी : १ ते १३ ऑगस्ट, २०२१
- सुरुवात : २००३; पहिला त्रिसेवा (लष्कर, नौदल आणि हवाई दल) सराव – २०१७
ठळक मुद्दे :
१) आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांच्या कारवाया रोखण्यासाठी, दहशतवादविरोधी मोहिमांच्या परिचालनासाठी संयुक्त राष्ट्रांच्या नियमावलीनुसार संयुक्तपणे काम करण्याचा सराव.
२) या सरावात दोन्ही देशांतील २५० जवान भाग घेणार असून संयुक्त सरावात सहभागी होण्यापूर्वी जवानांची युद्धकौशल्ये अधिक सफाईदार व्हावीत यासाठी कठोर प्रशिक्षण.
इंद्र – २१ चे महत्त्व :
१) भारत आणि रशिया या देशांच्या लष्करांमध्ये परस्परांवरील विश्वास अधिक दृढ होईल तसेच आंतर-कार्यप्रणालीचे परिचालन सुधारेल. ज्यामुळे दोन्ही देशांतील आकस्मिक गरजेच्या वेळी या देशांच्या लष्करात अधिक उत्तम सुसंवाद राखणे शक्य होईल.
२) या दोन्ही देशांतील संरक्षणविषयक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा.
काही महत्त्वपूर्ण लष्कर सराव –
नाव | देश |
१) IMBEX | भारत-म्यानमार |
२) संप्रीती | भारत-बांगलादेश |
३) मित्रशक्ती | भारत-श्रीलंका |
४) वरुण | भारत-फ्रान्स |
५) सिम्बेक्स | भारत-सिंगापूर |
६) गरूड | भारत-फ्रान्स |
७) युद्ध अभ्यास | भारत-अमेरिका |
८) मैत्री | भारत-थायलंड |
९) मलबार लष्कर सराव | भारत-जपान-अमेरिका |
१०) एकुवेरिन | भारत-मालदीव |
११) नोमॅडिक एलिफन्ट | भारत-मंगोलिया |
१२) धर्मा गार्डियन | भारत-जपान |
१३) वज्र प्रहार | भारत-अमेरिका |
१४) शिन्यूमंत्री | भारत-जपान |
१५) हँड इन हँड | भारत-चीन |
१६) सूर्यकिरण | भारत-नेपाळ |
१७) काझिंद | भारत-कझाकिस्तान |
१८) अल नगाह | भारत-ओमान |