इंडोनेशियाच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

इंडोनेशियाच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

 • इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण करणारे श्रीविजया एअरचे विमान समुद्रात कोसळले होते.
 • या विमानात १२ क्रू सदस्यांसह एकूण ६२ प्रवासी होते, यात बहुतेक कर्मचारी व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
 • फ्‍लाइट रडार २४ ने हे विमान एका मिनिटात १० हजार फूट खाली आल्याचे ट्रॅक केले होते.
 • लकांग व लाकी बेटांच्या दरम्यान काम करणाऱ्या स्थानिक मच्छिमारांनी हे विमान कोसळताना पाहिले होते.
 • श्रीविजया एअर फ्लाइट १८२ हे विमान नौदलातील ‘सोनार (SONAR) यंत्राच्या मदतीने शोधण्यात यश आले.
 • इंडोनेशियाच्या पाणबुड्यांना या विमानाच्या सांगाड्याचे भाग जावाच्या सागरात २३ मीटर म्हणजे अंदाजे ७५ फूट खोलीवर सापडले.
 • या पाणबुड्याच्या पथकालाच अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला आहे.
 • ब्लॅक बॉक्स सापडल्याने बोइंग ७३७ – ५०० या विमानाच्या अपघाताचे कारण शोधण्यास मदत होणार आहे.
 • त्यात विमानाची कागदपत्रे आहेत, की ते कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आहे, याबाबत तपास सुरू आहे.

श्रीविजया एअर फ्‍लाईट – १८२

 • विमानाच्या रजिस्ट्रेशन नंबरनुसार २६ वर्षे जुने विमान
 • बोइंग ७३७ – ५०० या साखळीतील
 • याआधी अमेरिकेतील हवाई कंपन्यांनी वापरले होते.
 • श्रीविजया एअर इंडोनेशियातील एक स्थानिक बजेट एअरलाइन्स असून इंडोनेशिया आणि अन्य दक्षिण-पूर्व आशियाई भागातील प्रवासासाठी सेवा देते.
 • शेवटचा उड्डाण मार्ग – जकार्ता ते पॉन्टियानक

Contact Us

  Enquire Now