आशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये IISc बंगळुरू ३६व्या स्थानी
- टाइम्स हायर एज्युकेशन आशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारतातील ८ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू ३६व्या स्थानी आहे. भारतातील सहा आयआयटी आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचा या यादीत समावेश आहे. भारतातील ४८९ विद्यापीठांनी या रँकिंगच्या प्रक्रियेत सहभाग घेतला होता.
- चीनमधील त्सिंघूआ विद्यापीठ आणि पेकिंग विद्यापीठ अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्या क्रमांकावर आहे. तिसर्या स्थानावर नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आहे.