आशिया खंडातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प

आशिया खंडातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प

 • पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मध्य प्रदेशातील रीवा सौर प्रकल्प या आशियातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले. 
 • ७७५० मेगावॅटचा अल्ट्रा सौर ऊर्जा प्रकल्प १,५९० एकरांवर पसरलेला आहे.
 • यात १५०० हेक्टर सौर ऊर्जा उत्पादन क्षेत्रात ५०० हेक्टर जमिनीवर प्रत्येकी २५० मेगावॅट क्षमतेचे तीन सौर उत्पादन करणारे युनिट आहेत. 
 • मध्यप्रदेश ऊर्जा विकास निगम लिमिटेड (MPUVN) आणि सौर ऊर्जा निगम इंडिया (SECI) चा संयुक्त उपक्रम असलेल्या रीवा अल्ट्रा मेगा सौर लिमिटेड (RUMSL) यांनी हा प्रकल्प विकसित केला आहे. 
 • RUMSL ला प्रकल्पाच्या विकासासाठी केंद्रामार्फत १३८ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. 
 • यामुळे वर्षाकाठी १५ लाख टन कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी होते. 
 • याद्वारे ग्रीड समानतेचा अडथळा दूर होईल.
 • राज्याबाहेरील ग्राहकांना ऊर्जा पुरवठा करण्याचा हा नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्प आहे.
 • प्रकल्पातून दिल्ली मेट्रोला २४% ऊर्जा मिळेल आणि ७६% ऊर्जा मध्य प्रदेशातील राज्य डिस्कॉम्सना पुरविली जाईल.
 • रीवा सौर ऊर्जा प्रकल्पाला जागतिक बँक समूहाचा अध्यक्ष पुरस्कार मिळाला आहे. तसेच पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या ‘अ बुक ऑफ इनोव्हेशन : न्यू बिगिनिंग्स’ या पुस्तकात त्याचा समावेश झालेला आहे.

Contact Us

  Enquire Now