आशियाई महिला फुटबॉल स्पर्धा २०२२ मध्ये भारतात होणार
- २० जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान आशियाई महिला फुटबॉल ही स्पर्धा भारतात होणार आहे. ही स्पर्धा १२ संघांमध्ये होणार आहे.
- ‘भारतात गेल्या काही वर्षांपासून फुटबॉलची चांगली प्रगती झाली आहे. आशियाई महिला स्पर्धेने त्यास चालना मिळेल’ असे मत आशियाई फुटबॉल महासंघाचे सचिव दातो विंडसर जॉन यांनी सांगितले.
- या स्पर्धेत मागच्या वर्षीच्या स्पर्धेतील तीन संघांना थेट प्रवेश असेल त्यांना पात्रता फेरी खेळावी लागणार नाही. त्यामुळे जपान, ऑस्ट्रेलिया आणि चीन पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर यजमान भारतास थेट प्रवेश असेल.
- ही स्पर्धा १९७९ नंतर प्रथमच भारतात आयोजित करण्यात येत आहे. भारतात आयोजित १९७९ मधील स्पर्धेत भारताने उपविजेतेपद प्राप्त केले होते.
- मागच्या वर्षी या स्पर्धेत ८ संघ होते, ते वाढवून या वर्षी १२ करण्यात आले आहेत. या स्पर्धेची पात्रता फेरी १३ ते २५ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या १२ संघांमधून विजेते ५ संघ विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरतील, कारण ही स्पर्धा २०२३च्या विश्वकरंडक स्पर्धेची पात्रता असणार आहे.