आर बी आय चे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून शासनाने एम राजेश्वर राव यांची नेमणूक केली

आर बी आय चे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून शासनाने एम राजेश्वर राव यांची नेमणूक केली

  • भारत सरकारने एम राजेश्वर राव यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चौथ्या नवीन डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती केली.
  • त्यांनी पूर्वीचे डेप्युटी गव्हर्नर एन एस विश्वनाथ यांची जागा घेतली ज्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच मार्च २०२० मध्ये राजीनामा दिला होता.
  • एम राजेश्वर राव सध्या आर बी आयचे कार्यकारी संचालक मंडळात कार्यरत होते.

एम राजेश्वर राव

  • एम्. राजेश्वर राव १९८४ पासून आर बी आय मध्ये कार्यरत आहेत.
  • त्यांना नोव्हेंबर २०१६ मध्ये सांख्यिकी व माहिती व्यवस्थापन विभाग, वित्तीय बाजार संचालन विभाग आणि आंतरराष्ट्रीय विभाग यात जबाबदार कार्यकारी संचालक मंडळात नियुक्त केले होते.
  • त्यांनी वित्तीय बाजार ऑपरेशन विभागात मुख्य महाव्यवस्थापक म्हणून काम केले आहे.
  • त्यांनी नवी दिल्ली येथे बॅकिंग लोकायुक्तच्या रूपात अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई आणि नवी दिल्ली येथे RBI च्या क्षेत्रीय कार्यालयात काम केले आहे.

आर बी आय बद्दल

  • गव्हर्नर – शक्तिकांत दास
  • मुख्यालय – मुंबई, महाराष्ट्र
  • निर्मिती – १ एप्रिल १९३५

आर बी आय ची कार्ये

  1. चलनविषयक धोरणांची अंमलबजावणी
  2. सरकारची बँक (Bank of Government)
  3. बँकांची बँक (Bank of Bank)
  4. चलन प्रसारक (Essure of Currency)
  5. विकासात्मक कार्ये – (Development Function)

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now