आर्या राजेंद्रन भारतातील सर्वात युवा महापौर
- तिरुअनंतपुरमच्या (केरळ) महापौरपदी 21 वर्षीय आर्या राजेंद्रन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) जिल्हा समितीने आर्याची निवड केली आहे.
- बीएससी (गणित) च्या दुसऱ्या वर्षात शिकत असतानाच त्यांची निवड केल्याने त्या देशातील सर्वात युवा महापौर ठरल्या आहेत.
- आर्या ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ (डाव्या पक्षाचा विद्यार्थी विभाग) राज्य समितीच्या सदस्य व ‘बालसंघम’ (डाव्या पक्षाचा बालविभाग) च्या अध्यक्षाही आहेत.
- तिरुअनंतपुरम महानगरपालिका निवडणुकीत मुडाव–मुगल वॉर्डातून त्या विजयी झाल्या आहेत. (100 पैकी 54 मतांनी)
- व्ही. के. प्रशांत तिरुअनंतपुरमचे महापौर होते. 2015ला त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. वयाच्या 34व्या वर्षी त्यांची नियुक्ती झाल्याने याआधी तिरुअनंतपुरममधील ते सर्वात युवा महापौर होते.
- भारतातील सर्वात युवा महापौर सविता बेगम होत्या. त्या कोलम महानगरपालिका (केरळ) मधून वयाच्या 29व्या वर्षी 2000 साली निवडून आल्या होत्या.