आर्थिक वर्ष 2021 मध्ये भारताचा जीडीपी 10.3 टक्क्यांनी घसरणार : IMF
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, IMFने आर्थिक वर्ष 2020-21मध्ये भारताचा जीडीपी 10.3% घसरण्याचा अंदाज वर्तविला आहे.
- यापूर्वी कोविड-19 साथीच्या रोगामुळे IMFने भारताचा जीडीपी 4.5 टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज वर्तविला होता.
- अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताचा जीडीपी 8 टक्क्यांनी वाढेल, वित्तीय वर्ष 2021-22 साठी यापूर्वी हा अंदाज 5.2 टक्के होता.
मुख्य मुद्दे :
- ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) राष्ट्रांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सर्वात कमी आहे.
- विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष 2020-21च्या पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपीमध्ये 23.9 टक्क्यांची घसरण झाली.
- सप्टेंबर 2020मध्ये भारताची किरकोळ चलनवाढ आठ महिन्यांच्या उच्चांकी 7.34% वर गेली.
- अंदाजानुसार, केवळ चीनी अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष 2020-21मध्ये पूर्वीच्या 1% अंदाजापेक्षा 1.9% वेगाने वाढेल.
अलिकडील संबंधित :
- देशांतर्गत रेटिंग एजन्सीने (इंडियन रेटिंग्ज ॲण्ड रिसर्च) भारताच्या जीडीपी वाढीचे प्रमाण पूर्वीच्या 5.3% वरून 11.8% पर्यंत कमी केले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) बद्दल थोडक्यात :
पार्श्वभूमी : जागतिक महामंदीतून आणि नंतरच्या दुसऱ्या महायुद्धातून सावरण्यासाठी ब्रेटनवूडस् परिषदेत IMF आणि जागतिक बँकेची निर्मिती करण्यात आली.
स्थापना : 27 डिसेंबर 1945 (1 मार्च 1947 पासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात)
सदस्य : 189 देश (12 एप्रिल 2016ला नौरू प्रजासत्ताक या देशाला सदस्यत्व मिळाल्याने एकूण संख्या 189)
- IMF ही जागतिक बाजारपेठेत अर्थव्यवस्थेसाठी मध्यवर्ती बँकेची भूमिका बजावते.
उद्दिष्टे :
- विनिमय दर स्थिर राखण्यास मदत करणे.
- आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत करणे.
iii. आंतरराष्ट्रीय चलन विनिमयात सहकार्य करणे.
मुख्यालय : वॉशिंग्टन (डी.सी.) अमेरिका
अध्यक्ष : ख्रिस्टलिना जॉर्जिव्हा (सध्या – 1 ऑक्टोबर 2019 पासून)
(याआधी – क्रिस्टिन लॅगार्ड), परंपरेने IMFचे अध्यक्षपद युरोपियन देशांकडे असते.
भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ या IMFच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आहेत.